
6 Best Safe SUVs in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सध्या एखाद्या आजाराने जितक्या लोकांचा मृत्यू झाला नाही, त्यापेक्षा जास्त लोकांचा अपघातात मृत्यू दरवर्षी होत असतो. आपण चांगली कार चालवू शकतो पण समोरच्या गाडीवाल्याचा काही नेम नसतो. त्यामुळे आता कार घेताना लोक सगळ्यात आधी सेफ्टी रेटिंग किती आहे, हेच बघतायत. सध्या SUV घ्यायचा लोकांचा कल वाढलाय. भारतातल्या 6 बेस्ट सेफ्टीमध्ये बेस्ट अशा SUV कोणत्या ते बघूया. 6 Best Safe SUVs in India:
दक्षिण कोरियन कंपनी Kia ची फेमस मिड-साईज SUV Kia Seltos ने सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवून बाजी मारली. Kia Seltos ने आधी Bharat NCAP मध्ये 5-स्टार मिळवले होते. त्यानंतर आता Kia Seltos ने युरोपच्या सगळ्यात अवघड अशा सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये Euro NCAP मध्ये पण 5-स्टार मिळवला.
Kia Seltos ही K3 प्लॅटफॉर्म आणि हाय-स्ट्रेंथ स्टीलवर बनवली. आता ग्लोबल मार्केटमध्ये तिने आपली जागा आणखी मजबूत केली. भारी लूक, दमदार इंजिन आणि चांगली सेफ्टी यामुळे Kia Seltos ही आपल्या सेगमेंटमध्ये टँकसारखी दणकट ठरली. लेव्हल-2 ADAS सह 21 सेफ्टी फिचर्स दिले. Kia Seltos ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.25 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 22.02 लाख रुपयांपर्यंत आहे.
टाटा मोटर्सची Tata Punch ही सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालेली मायक्रो SUV आहे. नुकतंच टाटा मोटर्सने Tata Punch चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलंय. ही एक दणकट आणि दमदार SUV आहे. Tata Punch च्या बेस मॉडेल Smart ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाखांपासून सुरू होते.
मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार
ही एक बजेट SUV असून तुम्हाला Mini Harrier चा फील देईल. एवढंच नाही तर सेफ्टीमध्ये ही गाडी अव्वल आहे. Tata Punch iCNG 2026 फेसलिफ्ट नुकतंच लाँच झालं. यात 1 लिटरचं इंजिन दिलंय. Tata Punch iCNG चं मायलेज 26.99 किमी इतकं आहे. या Tata Punch iCNG ची किंमत 7.64 लाखांपासून सुरू होते.
Maruti Suzuki ने आपल्या फेमस Brezza चं फेसलिफ्ट व्हेरियंट सुद्धा मजबुतीत कमी नाही. Maruti Suzuki Brezza Facelift ला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग सेफ्टीमध्ये मिळालं. Brezza मध्ये आता नवीन 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं, जे 110 एचपी पॉवर आणि 170Nm टॉर्क देतं. तसंच ब्रेझामध्ये 1.5-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पण कायम ठेवलंय जे 103 एचपी पॉवर आणि 139Nm टॉर्क देतं. या इंजिनमध्ये CNG ऑप्शन सुद्धा दिला.
दक्षिण कोरियन कंपनी हुंदईची Exter ने मागच्या काही वर्षांपासून आपला दबदबा कायम ठेवला. बॉक्सी लूक आणि दमदार फिचर्समुळे मध्यमवर्गीयांची ही कार फेव्हरेट ठरली. नुकतंच नवीन फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच झालं. या Hyundai Exter ची किंमत 5.79 लाखांपासून सुरू होते. या SUV मध्ये आणखी 25 नवे फिचर्स जोडलेत. Hyundai Exter मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल 4-सिलेंडर इंजिन दिलंय, जे 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क देतं. मायलेजबद्दल बोलायचं तर पेट्रोलमध्ये ही 19.2 ते 19.4 किमी आणि CNG मध्ये 27 किमीपेक्षा जास्त मायलेज देते.
महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!
Renault Kiger ही एक स्वस्तात मस्त आणि स्टाईलिश अशी मिड साईज SUV आहे. या Renault Kiger च्या Authentic बेस व्हेरियंटची किंमत 5.76 लाखांपासून सुरू होते. Renault Kiger मध्ये 1.0 लीटरचं इंजिन दिलं. जे 72hp नॅच्युरली एस्पिरेटेड आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. मायलेजबद्दल बोलायचं तर पेट्रोल मॅन्युअलमध्ये ही SUV 20 किमी इतकं मायलेज देते. तर CVT ऑटोमॅटिकमध्ये 18.24 किमी इतकं मायलेज देते.
जपानी कंपनी निसानने भारतात आपली सगळ्यात स्वस्त आणि मजबूत अशी Nissan Magnite SUV आणलीय. मागच्या काही वर्षांपासून या SUV चा दबदबा अजूनही मार्केटमध्ये कायम आहे. Nissan Magnite चं बेस व्हेरियंट Visia मॉडेलची किंमत एक्स-शोरूम 5.62 लाखांपासून सुरू होते, कमी बजेटमध्ये ही सगळ्यात बेस्ट SUV आहे. Nissan Magnite मध्ये CNG सुद्धा पर्याय आहे.
नुकतंच Nissan Magnite CNG लाँच झालंय. ही भारतातली सगळ्यात स्वस्त SUV पैकी एक आहे. या Nissan Magnite CNG ची किंमत 7 लाखांपासून सुरू होते. यात 1 लिटरचं इंजिन दिलंय. मायलेज तब्बल 24 किमी इतकं देते. खास म्हणजे, ही पण टाटाच्या गाड्यासारखी 5 स्टार सेफ्टी रेटिंग असणारी SUV आहे.
Ans: बातमीत Kia Seltos, Tata Punch, Maruti Brezza आणि Nissan Magnite या SUV चा उल्लेख आहे.
Ans: Kia Seltos ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.25 लाख रुपये आहे.
Ans: Tata Punch iCNG चे मायलेज 26.99 किमी असल्याचे बातमीत नमूद केले आहे.