Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!

कधीकाळी भारतीय मध्यमवर्गीयांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मारुती 800 ला आता जागतिक सन्मान मिळाला आहे. FIVA World Vehicle Heritage Award मिळवणारी ती पहिली भारतीय कार ठरली आहे. तब्बल 29 लाखांहून जास्त कार तयार करणाऱ्या या मॉडेलचा इतिहास जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 17, 2026 | 08:53 PM
Maruti 800 Wins Global Vehicle Heritage Award (फोटो सौजन्य-AI एआय)

Maruti 800 Wins Global Vehicle Heritage Award (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • मारुती 800 ही FIVA World Vehicle Heritage Award मिळवणारी पहिली भारतीय कार ठरली आहे.
  • 1983 ते पुढील 3 दशकांत या कारच्या 29 लाखांहून जास्त युनिट्सचे प्रोडक्शन करण्यात आले.
  • 1987 मध्ये हंगेरी, फ्रान्स आणि बेल्जियमसह युरोपमध्ये मारुती 800 ची निर्यात सुरू झाली होती.

भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील लोकप्रिय कार मारुती 800 ने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान उंचावला आहे. या कारला प्रतिष्ठित FIVA World Vehicle Heritage Award मिळाला असून हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय कार ठरली आहे. 1983 मध्ये भारतीय मार्केटमध्ये दाखल झालेल्या या छोट्या हॅचबॅकने देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 21 ऐतिहासिक कारमध्ये मारुती 800 ही एकमेव भारतीय कार होती.

1983 मध्ये बदलले भारतीय कार मार्केट

मारुती 800 डिसेंबर 1983 मध्ये भारतात सादर करण्यात आली. त्यावेळी देशात वैयक्तिक कार वापरणाऱ्यांची संख्या कमी होती आणि सामान्य कुटुंबांसाठी कार खरेदी करणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत कॉम्पॅक्ट आकार, परवडणारी किंमत आणि सहज ड्रायव्हिंग यामुळे मारुती 800 घराघरात लोकप्रिय झाली.

ही कार सुझुकी मोटर कॉर्पोरेशन आणि भारत सरकार यांच्या भागीदारीत तयार करण्यात आली होती. या भागीदारीची सुरुवात 1982 मध्ये झाली. मारुती 800 चे मूळ डिझाइन जपानमधील सुझुकी SS80 मॉडेलवर आधारित होते.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!

30 वर्षांत तयार झाल्या 29 लाखांहून जास्त कार

मारुती 800 च्या सुरुवातीच्या प्रोडक्शनसाठी दरवर्षी 40,000 कार तयार करण्याची कॅपसिटी ठेवण्यात आली होती. पण या कारला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तिचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढले. तब्बल 3 दशकांपर्यंत ही कार तयार करण्यात आली आणि या काळात 29 लाखांहून जास्त युनिट्सचे प्रोडक्शन झाले.

या कारमुळे भारतात स्थानिक ऑटोमोबाईल पार्ट्स उद्योगालाही चालना मिळाली. भारतीय कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या वाहनांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता जगासमोर आणण्यातही तिचा वाटा होता.

मारुती सुझुकीची Tata Punch ला टक्कर देणारी Micro SUV 2027 मध्ये येणार? Y43 मध्ये मिळणार CNG आणि पेट्रोल इंजिन

युरोपमध्येही मारुती 800 ची निर्यात

1987 मध्ये मारुती 800 ची युरोपमध्ये निर्यात सुरू झाली. हंगेरी, फ्रान्स आणि बेल्जियम हे सुरुवातीचे देश होते. यामुळे भारतीय कार उत्पादन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यास मदत झाली.

FIVA म्हणजेच Fédération Internationale des Véhicules Anciens ही ऐतिहासिक वाहनांचे जतन करणारी आंतरराष्ट्रीय NGO संस्था आहे. ही संस्था युनेस्कोसोबतही भागीदार म्हणून कार्य करते. या पुरस्कारातून केवळ महागड्या किंवा दुर्मिळ कारच नव्हे, तर सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या वाहनांचाही सन्मान केला जातो. आज मारुती सुझुकी दरवर्षी 4 लाखांहून जास्त कार 120 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. त्यामुळे मारुती 800 चा हा सन्मान भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारुती 800 ला कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?

    Ans: मारुती 800 ला FIVA World Vehicle Heritage Award मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय कार ठरली आहे.

  • Que: मारुती 800 भारतात कधी लाँच झाली होती?

    Ans: मारुती 800 डिसेंबर 1983 मध्ये भारतात सादर करण्यात आली होती. ही कार सुझुकी SS80 मॉडेलवर आधारित होती.

  • Que: मारुती 800 चे एकूण किती युनिट्स तयार करण्यात आले?

    Ans: मारुती 800 च्या 3 दशकांच्या प्रोडक्शन काळात 29 लाखांहून जास्त युनिट्स तयार करण्यात आल्या. 1987 मध्ये या कारची युरोपमध्ये निर्यातही सुरू झाली होती.

Web Title: Maruti 800 fiva world vehicle heritage award first indian car auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण
1

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर
2

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन
3

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री
4

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.