फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारपेठेत स्कूटरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर स्कुटर शहरी आणि दैनंदिन वापरासाठी बाईकपेक्षा सोयीस्कर मानली जाते. तसेच सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया स्कुटर सहजपणे ऑपरेट करू शकतात. बाईक चालवताना आपल्याला सतत गिअर्स बदलावे लागतात. पण स्कुटर चालवताना आपल्याला फक्त वेग आणि ब्रेक वर लक्ष केंद्रित करायचे असते. त्यामुळेच अनेक जण स्कुटर्सला पसंती दर्शवित असतात.
जर तुम्ही सुद्धा यंदाच्या सणासुदीच्या मुहूर्तावर पेट्रोल स्कुटर घ्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पाच अशा स्कुटर्सबद्दल ज्या परफॉर्मन्समध्ये दमदार असतील. या यादीत 4 स्कुटर्स सर्वसामान्यांना परवडतील अशा आहे तर पाचवी बाईक ही बीएमडब्ल्यू आहे.
TVS कडून येणारी ही स्कूटर अतिशय पॉवरफुल स्कूटर आहे. यात 124.8 cc, सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 9.3bhp पॉवर आणि 10.5Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचे मायलेज 54.33 kmpl आहे. तसेच याची एक्स-शोरूम किंमत 97,491 रुपये आहे.
ही देखील वाचा: अरेच्चा! दिल्लीत चक्क ट्रॅफिक पोलीस देत आहे ५० हजार रुपयांचं बक्षीस, नेमकं कारण काय?
या स्कुटर मध्ये 124cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. त्याचे इंजिन 8.7PS ची कमाल पॉवर आणि 10Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर एका लिटरमध्ये 48 किलोमीटरचे मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 94,301 रुपये ते 1.15 लाख रुपये आहे.
या स्कुटरमध्ये हे 160cc BS6-अनुरूप एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन इन्स्टॉल केले आहे, जे 10.9PS पॉवर आणि 11.6Nm टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 35 किलोमीटरचे मायलेज देते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.44 लाख रुपये आहे.
या स्कुटरमध्ये आपल्याला 155cc लिक्विड-कूल्ड, SOHC, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे, जे 15PS पॉवर आणि 13.9Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 48.62 किलोमीटर मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.48 लाख ते 1.51 लाख रुपये आहे.
BMW च्या स्कूटर या नेहमीच पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. 350cc सिंगल-सिलेंडर मोटर आहे, जी 34.5PS ची पॉवर आणि 35Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 28.6 किलोमीटर मायलेज देते. या स्कुटरची एक्स-शोरूम किंमत 11.25 लाख रुपये आहे, जी नकीच सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे.