
अखेर New Kia Seltos च्या किमतीबाबत खुलासा!
सेकंड-जनरेशन सेल्टोस ही आकाराने अधिक मोठी, डिझाइनमध्ये अधिक आकर्षक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक प्रगत असून, भारतीय कुटुंबे आणि आधुनिक एसयूव्ही ग्राहकांसाठी परिपूर्ण पॅकेज म्हणून सादर करण्यात आली आहे. 4,460 मिमी लांबी, 1,830 मिमी रुंदी आणि 2,690 मिमी व्हीलबेससह ही एसयूव्ही केबिनमध्ये प्रशस्त जागा देणारी ठरते.
डिझाइनच्या बाबतीत, ऑल-न्यू सेल्टोस कियाच्या ‘Opposites United’ डिझाइन तत्त्वावर आधारित असून, नवीन डिजिटल टायगर फेस, ऑटोमॅटिक फ्लश डोअर हँडल्स, आयस क्यूब एलईडी प्रोजेक्शन हेडलॅम्प्स आणि 18-इंच अलॉय व्हील्समुळे ती अधिक प्रीमियम दिसते. ही एसयूव्ही 10 मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध असून, ‘मॉर्निंग हेझ’ आणि ‘मॅग्मा रेड’ हे दोन नवीन रंग पर्याय देण्यात आले आहेत.
केबिनमध्ये, सेगमेंटमधील सर्वोत्तम 30-इंच त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले, प्रीमियम Bose 8-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, तसेच स्मार्ट की प्रॉक्सिमिटी अनलॉकसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, 10-वे पॉवर ड्रायव्हर सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ड्युअल पॅन पॅनोरॅमिक सनरूफमुळे प्रवास अधिक आरामदायी होतो.
Hyundai Venue चा HX 5 Plus व्हेरिएंट लाँच, मिळणार एकापेक्षा एक हायटेक फीचर्स
सुरक्षिततेच्या दृष्टीने, ऑल-न्यू सेल्टोस कियाच्या नवीन K3 ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यात 24 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, 6 एअरबॅग्स आणि 21 फीचर्ससह लेव्हल-2 ADAS देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील तसेच महामार्गावरील ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण ठरते.
पॉवरट्रेन पर्यायांमध्ये 1.5L पेट्रोल, 1.5L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन देण्यात आले असून, 6MT, iMT, IVT, 7DCT आणि 6AT असे विविध ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. HTE, HTK, HTX आणि GTX/X-Line अशा चार मुख्य ट्रिम्ससोबत कस्टमाइज्ड पॅकेजेसही देण्यात आले आहेत.
अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथील किया प्लांटमध्ये या एसयूव्हीचे उत्पादन सुरू झाले असून, विस्तृत डिलर नेटवर्कमुळे देशभरात ग्राहकांना लवकरच डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे. आकर्षक किंमत, प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक फीचर्समुळे ऑल-न्यू किया सेल्टोस मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.