फोटो सौजन्य: @Praksbikersgui1 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये बाईक मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. हीच वाढती मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या देशात बेस्ट बजेट बाईक ऑफर करत आहे. यातीलच एक विश्वासाची कंपनी म्हणजे होंडा. भारतीय ग्राहक बाईक घेताना किंमतीवर विशेष लक्षकेंद्रित करताना दिसतो. हीच ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन होंडा कंपनीने देशात अनेक बजेट फ्रेंडली बाईक सादर केल्या आहेत. आता कंपनीने नुकतीच एक नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच केली आहे.
2025 Honda NX 200 ADV बाईक लाँच झाली आहे. त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि इंजिन दिले जात आहे. बाईक किती किमतीत लाँच झाली आहे. होंडा CB200X चे नाव बदलून या बाईकला का आणले? त्याबद्दल आपण या जाणून घेणार आहोत.
Kia प्रत्येक सेगमेंटमध्ये Electric SUVs आणायच्या तयारीत, सोशल मीडियावर शेअर केला पहिला टीझर
होंडाने भारतात 200 सीसी सेगमेंटमधील एक नवीन बाईक म्हणून 2025 ची होंडा एनएक्स 200 एडीव्ही बाईक लाँच केली आहे. ही बाईक कंपनीने आधी Honda CB200X या नावाने बाजारात आणली होती, पण आता ती काही किरकोळ अपडेटसह नवीन नावाने आणली आहे.
होंडाने या बाईकमध्ये काही अपडेट्स केले आहेत. यात एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न सिग्नल, मस्क्युलर फ्युएल टँकसह एलईडी टेल लॅम्प, 4.2 इंच फुल डिजिटल टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, होंडा रोड सिंक, यूएसबी चार्जिंग पोर्ट अशी अनेक फीचर्स आहेत.
बाईकमध्ये सुरक्षिततेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. ही बाईक होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) ने सुसज्ज आहे, जे रस्त्याच्या परिस्थितीनुसार मागील चाकाचे ट्रॅक्शन सेट करण्यास मदत करते. बाईकमध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच, ड्युअल चॅनेल एबीएस सारखे सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
तब्बल 4 लाख पॉइंटद्वारे ‘ही’ बलाढ्य कंपनी भारतातील EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देणार
होंडाने या बाईकमध्ये 184.4 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे पीजीएम-एफआय तंत्रज्ञानासह आणले गेले आहे. या इंजिनसह, बाईकला 12.5 किलोवॅटची शक्ती आणि 15.7 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. बाईकला 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
ही बाईक कंपनीने तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केली आहे. यात अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, रेडियंट रेड मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक रंगांचा समावेश आहे. ही बाईक एकाच व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 169499 रुपये ठेवण्यात आली आहे.
होंडाची ही नवीन बाईक 200 सीसी सेगमेंटमध्ये आणण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये, ही बाईक बजाज, केटीएम, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाइक्सशी थेट स्पर्धा करेल.