Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक घ्यायचीय तेही 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये? Ola ते Royal Enfieldच्या या बाइक्सची किंमत आहे परवडणारी

2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये आता प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलींचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जास्त रेंज, दमदार स्पीड आणि आधुनिक फीचर्समुळे अल्ट्रावॉयलेट, रॅप्टी.एचव्ही, रॉयल एनफिल्ड आणि ओलाच्या बाइक्स ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 15, 2026 | 07:34 PM
प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक घ्यायचीय तेही 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये? Ola ते Royal Enfieldच्या या बाइक्सची किंमत आहे परवडणारी
Follow Us
Follow Us:
  • 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलींचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
  • अल्ट्रावॉयलेट X-47 क्रॉसओव्हरची IDC रेंज 323 किमीपर्यंत असून टॉप स्पीड 145 kmph आहे.
  • ओला Roadster Pro मध्ये ADAS, मोठी बॅटरी आणि 579 किमीपर्यंत IDC रेंज मिळते.
भारतात इलेक्ट्रिक मोटरसायकलींची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे आता चांगली रेंज, दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम फीचर्स असलेली इलेक्ट्रिक बाइक घेण्यासाठी फार मोठे बजेट ठेवण्याची गरज नाही. 2 ते 3 लाख रुपयांच्या आसपासच्या किमतीत काही आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये अल्ट्रावॉयलेट, रॅप्टी.एचव्ही, रॉयल एनफिल्ड आणि ओला यांसारख्या कंपन्यांच्या बाइक्सचा समावेश आहे.

अल्ट्रावॉयलेट X-47 क्रॉसओव्हर

अल्ट्रावॉयलेट X-47 क्रॉसओव्हर ही डेली कम्यूटसोबत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही तयार करण्यात आली आहे. यात इंटिग्रेटेड डॅशकॅम, विविध राइडिंग मोड्स आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्स मिळतात. बाइकची IDC रेंज 323 किमीपर्यंत असून टॉप स्पीड 145 kmph आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 2,59,000 रुपयांपासून सुरू होते.

रॉयल एनफील्डची नवीन 750cc बाइक टेस्टिंगमध्ये; फेअरिंग आणि ड्युअल डिस्क ब्रेकने वेधले लक्ष

रॅप्टी.एचव्ही T30

रॅप्टी.एचव्ही T30 मध्ये हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. त्यामुळे ही बाइक इलेक्ट्रिक कारसाठी उपलब्ध असलेल्या पब्लिक DC फास्ट चार्जरवरही चार्ज करता येते. कंपनीनुसार, तिची IDC रेंज 200 किमी आणि टॉप स्पीड 135 kmph आहे. या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2,39,000 रुपये आहे.

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6

रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Flying Flea C6 आपल्या निओ-रेट्रो डिझाइनमुळे वेगळी दिसते. हलक्या अॅल्युमिनियम फ्रेमसह यात 154 किमी रेंज आणि 115 kmph टॉप स्पीड मिळतो. BaaS पर्यायासह तिची किंमत 1.99 लाख रुपयांपासून आहे. ड्युअल-चॅनल ABS हेही महत्त्वाचे सेफ्टी फीचर आहे.

लडाखच्या खडतर वाटांवर रॉयल एनफिल्ड हिमालयन 450! ऑफ-रोड राइडचा भन्नाट अनुभव

ओला Roadster Pro आणि अल्ट्रावॉयलेट F77 Mach 2

ओला Roadster Pro मध्ये 10-इंच TFT टचस्क्रीन, ADAS, राइडिंग मोड्स आणि व्हॉइस कंट्रोलसारखी फीचर्स मिळतात. टॉप व्हेरिएंटची IDC रेंज 579 किमी असून किंमत 1,99,999 ते 2,49,999 रुपये आहे. तर अल्ट्रावॉयलेट F77 Mach 2 ची रेंज 323 किमी, टॉप स्पीड 155 kmph आणि किंमत 3.09 लाख ते 4.24 लाख रुपये आहे. स्पोर्टी डिझाइन आणि वेगाला प्राधान्य देणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरतो.

 

Web Title: Affordable premium electric motorcycles india ola royal enfield ultraviolette auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

फ्रॉन्क्स ते ग्रँड विटारा! लवकरच येणार मारुतीच्या 5 Facelift Cars; पाहा कोणती बनेल तुमची फेवरेट!
1

फ्रॉन्क्स ते ग्रँड विटारा! लवकरच येणार मारुतीच्या 5 Facelift Cars; पाहा कोणती बनेल तुमची फेवरेट!

फुल चार्जमध्ये 323km रेंजचा दावा! फ्रंट-रियर HD कॅमेऱ्यासह अल्ट्रावॉयलेट एक्स47, ऑफिस-कॉलेजसाठी दमदार पर्याय
2

फुल चार्जमध्ये 323km रेंजचा दावा! फ्रंट-रियर HD कॅमेऱ्यासह अल्ट्रावॉयलेट एक्स47, ऑफिस-कॉलेजसाठी दमदार पर्याय

रॉयल एनफील्डची नवीन 750cc बाइक टेस्टिंगमध्ये; फेअरिंग आणि ड्युअल डिस्क ब्रेकने वेधले लक्ष
3

रॉयल एनफील्डची नवीन 750cc बाइक टेस्टिंगमध्ये; फेअरिंग आणि ड्युअल डिस्क ब्रेकने वेधले लक्ष

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या
4

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.