(फोटो सौजन्य-AI एआय)
स्पोर्टी डिझाइन ठरणार खास आकर्षण
नवीन बाइकचे डिझाइन सध्याच्या कॉन्टिनेंटल GT 650पेक्षा वेगळे असेल. गोल हेडलॅम्पभोवती फेअरिंग, क्लिप-ऑन हँडलबार आणि बार-एंड मिरर यामुळे तिला अधिक आक्रमक कॅफे रेसर लूक मिळू शकतो. फेअरिंगमुळे वेगाने बाइक चालवताना वाऱ्याचा दाब कमी होण्यासही मदत होईल. टेस्टिंग मॉडेलमध्ये अलॉय व्हील आणि ब्लॅक फिनिश असलेले इंजिन व एक्झॉस्टही दिसून आले आहेत.
Cruiser, Bobber, Roadster की Scrambler? जाणून घ्या 4 बाइक्समधील नेमका फरक
750cc ट्विन इंजिनमुळे वाढणार ताकद
या बाइकमधील सर्वात मोठा बदल तिच्या इंजिनमध्ये होण्याची शक्यता आहे. रॉयल एनफील्डच्या नवीन 750cc पॅरलल-ट्विन इंजिनकडून सुमारे 50-55 bhp पॉवर आणि 60 Nm पेक्षा जास्त टॉर्क मिळण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले जाऊ शकते. पण कंपनीने अद्याप अधिकृत पॉवर आणि टॉर्क आकडे जाहीर केलेले नाहीत.
ड्युअल डिस्क ब्रेक आणि आधुनिक फीचर्स
750cc क्षमतेनुसार बाइकच्या ब्रेकिंग हार्डवेअरमध्येही सुधारणा केली जात आहे. टेस्ट बाइकच्या पुढील बाजूस ड्युअल डिस्क ब्रेक स्पष्टपणे दिसतात. यासोबत ड्युअल-चॅनल ABS, ट्यूबलेस टायर्स आणि अलॉय व्हील मिळण्याची शक्यता आहे. ऑल-LED लाइटिंग, स्लिपर क्लच आणि ट्रिपर नेव्हिगेशनसह ट्विन-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही दिले जाऊ शकते.
किंमत आणि लॉन्च
रॉयल एनफील्डने अद्याप या बाइकची किंमत किंवा लॉन्च तारीख जाहीर केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला तिचे सादरीकरण होऊ शकते. अंदाजे किंमत ₹3.8 लाख ते ₹3.9 लाख एक्स-शोरूम असण्याची शक्यता आहे. कॉन्टिनेंटल GT 650पेक्षा जास्त प्रीमियम आणि दमदार पर्याय म्हणून ही बाइक बाजारात येऊ शकते.






