Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडी चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स, 10 दिवसांमध्ये शिकाल परफेक्ट कार

सुरुवातीच्या दिवसांमध्ये गाडी चालवणे काहींना अतिशय कठीण वाटते. पण कारचे बेसिक कंट्रोल्स,एक्सीलरेटर, ब्रेक, क्लच आणि स्टीअरिंग व्हीलकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास १० ते १५ दिवसांमध्ये तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 12:58 PM
गाडी चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स, 10 दिवसांमध्ये शिकाल परफेक्ट कार

गाडी चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स, 10 दिवसांमध्ये शिकाल परफेक्ट कार

Follow Us
Follow Us:

आपल्यातील अनेकांना गाडी चालवण्याची खूप जास्त भीती वाटते. काहींना बाईक चालवता येते तर काहींना कार चालवता येते. पण दोन्ही गाड्या चालवण्यास शिकणे अतिशय फायदेशीर आहे. घरातील कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये घरात गाडी असेल तर खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे गाडी चालवणे हे केवळ स्किल नसून अनेक परिस्थितींमध्ये फायदेशीर ठरणारे साधन आहे. पण काहींना गाडी चालवताना खूप जास्त भीती वाटते. यालाच Driving Anxiety किंवा Driving Phobia असे सुद्धा म्हंटले जाते. पूर्वी झालेला अपघात, गर्दीचे रस्ते किंवा महामार्गावर वाहन चालवण्याची भीती, इतर वाहनचालकांच्या चुकीच्या वागणुकीची चिंता इत्यादी अनेक कारणांमुळे गाडी चालवण्याची मनात भीती निर्माण होते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये गाडी चालवणे अतिशय कठीण वाटत असेल तरीसुद्धा काही दिवसांनंतर अतिशय सोपे होऊन जाते. योग्य पद्धतीने गाडी शिकल्यास कमी दिवसांमध्ये तुम्ही हायवेला गाडी चालवू शकता. चला तर जाणून घेऊया गाडी चालवण्याचे सोपे नियम आणि टिप्स.(फोटो सौजन्य – istock)

ह्युंदाई क्रेटा ईव्ही लॉन्च; ‘BaaS’ मॉडेलमुळे किंमत अवघ्या १०.९९ लाखांपासून सुरू

गाडी शिकताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स:

योग्य ट्रेनरची निवड:

कोणतीही गाडी शिकायला जाताना सगळ्यात आधी चांगल्या ट्रेनरची निवड करावी. कारण शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रायव्हिंग लर्निंग स्कूल असतात. पण काही भागांमध्ये योग्य प्रशिक्षण देणारा ट्रेनर नसतो. यामुळे गाडी चालवताना तुमचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही गाडी शिकण्यास जाण्याआधी आधी योग्य ट्रेनर आणि गाडी चालवण्याचे सर्व नियम नीट माहित करून घ्यावेत. एक महिन्याचा कोर्स पूर्ण करताना त्यात थ्योरीटिकल आणि प्रॅक्टिकल अशी दोन्ही माहिती उपलब्ध करून दिली जाते.

कारचे बेसिक कंट्रोल्स समजून घेणे:

गाडी शिकताना थेट कार चालवण्यास जात असाल तर कारचे बेसिक कंट्रोल्स समजून घेणे फार आवश्यक आहे. स्टीअरिंग व्हील, अ‍ॅक्सिलरेटर, ब्रेक, क्लच आणि गियर यांसारखी कंट्रोल्स नीट समजल्यास १० ते १५ दिवसांमध्ये तुम्हाला व्यवस्थित गाडी चालवता येईल. ड्रायव्हिंग करताना सगळ्यांचं कायमच नवनवीन माहिती मिळत असते. कोणताही व्यक्ती जन्मापासून गाडी किंवा इतर कामे शिकून येत नाही. त्यामुळे गाडी चालवताना मन स्थिर आणि शांत असणे फार आवश्यक आहे. याशिवाय गाडी चालवताना जास्त घाई करू नये.

‘चल मेरी लुना’! साधेपणाचे दुसरे नाव आणि भारतीय ऑटोमोबाईल क्रांतीचा सुवर्णकाळ

सुरक्षित ठिकाणी प्रॅक्टिस करा:

गाडी चालवताना कायमच सुरक्षित ठिकाणी प्रॅक्टिस करावी. कारण सतत ये जा करणाऱ्या रस्त्यावर गाडी चालवल्यास अपघात होण्याची जास्त शक्यता असते. ड्रायव्हिंग करताना एक्सीलरेटर, ब्रेक, क्लच आणि स्टीअरिंग व्हीलकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. वरील सर्व टिप्स फॉलो करून गाडी चालवल्यास १५ ते २० दिवसांमध्ये परफेक्ट गाडी चालवू शकता.

Web Title: Afraid to drive then follow these simple and important tips youll learn to drive a car perfectly in 10 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • car driving tips

संबंधित बातम्या

Car Driving Tips: धावत्या कारमध्ये अचानक रिव्हर्स गिअर टाकल्यास काय होईल? गिअरबॉक्सचे किती नुकसान होऊ शकते? जाणून घ्या
1

Car Driving Tips: धावत्या कारमध्ये अचानक रिव्हर्स गिअर टाकल्यास काय होईल? गिअरबॉक्सचे किती नुकसान होऊ शकते? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.