फोटो सौजन्य: @PoliceAhmedabad (X.com)
कधी कुठला चित्रपट हा तरुणाईला वेड लावेल हे सांगता येत नाही. असाच एक चित्रपट सध्या देशभरात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट म्हणजे सैयारा ! ना कोणते प्रमोशन ना कोणती मार्केटिंग, तरी सुद्धा हा चित्रपट रोज बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावत आहे. विशेषकरून, तरुण पिढीने या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. मोठ्या संख्येत तरुण-तरुणी हा चित्रपट पाहण्यास गर्दी करत आहे.
आतापर्यंत या चित्रपटाने 105.75 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे मिम्स देखील व्हायरल होत आहे. अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी असेच काहीसे केले आहे. त्यांनी या चित्रपटातील एका सिनच्या मदतीने लोकांना जागरूक करण्याचे काम केले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
एका Toyota Fortuner वर किती टॅक्स लावते सरकार? आकडा वाचाल तर हैराण व्हाल !
अहमदाबाद ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सैयारा चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता अहान पांडे हेल्मेटशिवाय दिसत आहे आणि तो अभिनेत्री अनिता पद्डाला बाईकवर बसण्यास सांगत आहे. या व्हिडिओमध्ये एक संवाद आहे की “अभि तो कुछ पल बाकी हैं हमारे पास”, हा संवाद जीवन किती नाजूक आहे आणि सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक असू शकते हे दर्शवितो.
या व्हिडिओमध्ये दोघांकडेही हेल्मेट नाही. या व्हिडिओद्वारे अहमदाबाद ट्रॅफिक पोलिसांनी लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या सैयारासोबत बाईक चालवायला जात असाल तेव्हा हेल्मेटला तुमचा साथीदार बनवा, अन्यथा प्रेम अपूर्ण राहील. हा मेसेज विशेषतः त्या तरुण प्रेमींसाठी आहे, जे अनेकदा स्टाईल मारताना हेल्मेट घालणे टाळतात.
एकटी स्कूटर Jupiter, Access आणि Chetak सारख्या स्कूटरवर भारी, फक्त 1 महिन्यात मिळवले 1.83 नवे ग्राहक
अहमदाबाद वाहतूक पोलिसांचा हा प्रयत्न रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी एक क्रिएटिव्ह आणि प्रभावी पाऊल आहे. ही मोहीम केवळ हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याने प्रियजनांचे नुकसान कसे होऊ शकते याची आठवण करून देते. या मोहिमेद्वारे, वाहतूक पोलिस रस्ते सर्वांसाठी सुरक्षित आहेत याची खात्री करू इच्छितात. स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाईकवरून फिरायला जात असाल तर हेल्मेट घालायला विसरू नका, यामुळे तुमचा सैयारा सुरक्षित राहील.