फोटो सौजन्य: X.com
भारतासह जगभरात लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटी आणि राजकारणी मंडळी आपल्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्सचा समावेश करत असतात. तसेच, सामान्य नागरिकांमध्ये देखील लक्झरी कार्सची चर्चा होत असतात.
भारतात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. रोल्स रॉयस ही त्यातीलच एक कंपनी. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक अशी व्यक्ती देखील होऊन गेली ज्यांनी आपल्या अपमानाचा बदला म्हणून कंपनीच्या कारचा वापर कचरा उचलण्यासाठी केला होता.
रोल्स-रॉइस कंपनीच्या कार्स अशा आहेत की बहुतेक लोकं त्या त्यांच्या कलेक्शनमध्ये समाविष्ट करण्याचे स्वप्न पाहतात. ही कार कंपनी आजच नाही तर वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य करीत आहे. त्याच वेळी, आपल्या देशातील एका राजाने फक्त एक-दोन रोल्स-रॉइस नाही तर सहा रोल्स-रॉइस कार्स एकत्र खरेदी केल्या आणि त्या कचरा गाडीत रूपांतरित केल्या होत्या. चला इंटरेस्टिंग स्टोरीबद्दल जाणून घेऊयात.
आता कार चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरज नाही ! येत्या 22 जून 2025 रोजी लाँच होणार Tesla ची ‘ही’ खास कार
रोल्स-रॉइस कारचे कचरा गाडीत रूपांतर करणारे भारताचे शासक अलवरचे राजा जयसिंग प्रभाकर होते. अलवरचे राजे यांना अनेक महागड्या वस्तू ठेवण्याचा शौक होता. त्यांच्याबद्दलची एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे ते थाटामाटात आणि वैभवाकडे विशेष लक्ष देत असत. ते दिवसातून अनेक वेळा कपडे बदलत असत आणि कधीकधी खास प्रसंगी पगडी देखील घालत असत.
माहितीनुसार, 1920 मध्ये जेव्हा अलवरचे राजे एकदा लंडनला गेले होते, तेव्हा त्यांनी तिथे रोल्स-रॉइस कार्सचे एक शोरूम पहिले. अगदी सामान्य कपड्यांमध्ये राजे त्या शोरूममध्ये गेले. त्या शोरूममध्ये सहा लक्झरी कार्स प्रदर्शित केल्या होत्या. राजांना त्या सर्व कार्स खूप आवडल्या आणि त्यांनी शोरूमच्या मालकाला सांगितले की त्यांना या सर्व कार्स घ्यायच्या आहेत.
राजांचे हे बोलणे ऐकून शोरूमच्या मालकाला वाटले की कोणीतरी त्याच्याशी मस्करी करत आहे आणि त्याने राजाला अपमानित केले आणि त्याला शोरूममधून हाकलून लावले. शोरूमच्या मालकाला कल्पनाही नव्हती की त्यांनी भारतातील शासकाचा अपमान केला होता.
राजा जयसिंग प्रभाकर हे सर्व सहन करू शकले नाही. यानंतर, त्यांनी त्याच्या दूतांमार्फत त्याच शोरूमला माहिती पाठवली की भारताचा एक शासक येथे येणार आहे. हे कळल्यानंतर, त्याच्या स्वागतासाठी लाल कार्पेट अंथरण्यात आले आणि राजांबद्दल सत्य जाणून घेतल्यानंतर त्यांना आदराने बोलावण्यात आले. राजाने सर्व सहा रोल्स-रॉयस खरेदी केल्या आणि त्या भारतात पाठवण्यास सांगितल्या.
KTM ने सादर केली Toyota Fortuner च्या किमतीची बाईक, फक्त 100 युनिट्सची होणार विक्री
आता कार चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरज नाही ! येत्या 22 जून 2025 रोजी लाँच होणार Tesla ची ‘ही’ खास कार
राजाने ऑर्डर केलेल्या रोल्स-रॉयस भारतात येताच, जयसिंग प्रभाकर यांनी त्या स्वतःसाठी वापरल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्या महानगरपालिकेत कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या. ते रोल्स-रॉयस कंपनीला बदनाम करू इच्छित होते.
भारतात कचरा गोळा करणाऱ्या कार्स म्हणून रोल्स-रॉयसचा वापर केला जात असल्याची बातमी जगात आगीसारखी पसरली. यामुळे रोल्स-रॉयस कंपनी घाबरली आणि त्यांना कळले की त्यांनी मोठी चूक केली आहे.
या घडलेल्या प्रकरणानंतर रोल्स-रॉयसने राजाला एक तार पाठवले. यात त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांने केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली. माफीचा तो संदेश पाहून, राजा जयसिंगने रोल्स-रॉयस कार्समार्फत कचरा गोळा करण्याचे काम थांबवले आणि कंपनीलाही माफ केले. यासोबतच, कंपनीने राजाला सहा कार्स मोफत भेट देण्याची विनंतीही केली. राजाने रोल्स-रॉइसकडून मिळालेली ही भेट स्वीकारली.