फोटो सौजन्य: iStock
जागतिक मार्केटमध्ये अनेक उत्तम आणि हाय परफॉर्मन्स कार्स ऑफर करणाऱ्या ऑटो कंपन्या आहेत. यातीलच एक आघाडीचे कार उत्पादक कंपनी म्हणजे टेस्ला. टेस्लाने ग्लोबल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनी लवकरच भारतीय मार्केटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवण्यास सज्ज होत आहे. याव्यतिरिक्त, टेस्ला येत्या 22 जून 2025 रोजी जागतिक मार्केटमध्ये ड्रायव्हरशिवाय चालणारी कार लाँच करणार आहे. चला या अनोख्या कारबद्दल जाणून घेऊयात.
टेस्ला येत्या 22 जून रोजी ग्लोबल लेव्हलवर सेल्फ-ड्रायव्हिंग Robotaxi लाँच करणार आहे. कंपनी पहिल्यांदा ती ऑस्टिन, टेक्सास, अमेरिकेत सुरू करणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये ही कार सादर करण्यात आली होती, तेव्हापासून ही जगभरात खूप लोकप्रिय झाली. आता लोकांना ही Robotaxi रस्त्यावर चालताना दिसणार आहे. टेस्ला रोबोटॅक्सी म्हणजे काय आणि ती कशी काम करेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
TATA MOTORS प्रेमींनो! पुढील ५ वर्ष तुमच्यासाठी… गाड्या पाहून ग्राहकांना लागेल वेड
एलोन मस्क यांनी टेस्ला रोबोटॅक्सीच्या लाँचिंगबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की 2 जून 2025 पासून टेस्ला त्यांची मॉडेल वाय एसयूव्ही रोबोटॅक्सी म्हणून लोकांसाठी लाँच करणार आहे. सुरुवातीला, त्याची सर्व्हिस फक्त ऑस्टिनमध्येच दिली जाईल. यासाठी 10 ते 20 कार वापरल्या जातील. ही कार ड्रायव्हरशिवाय चालतील, परंतु सुरुवातीला ऑपरेटरकडून त्यावर लक्ष ठेवले जाईल. जर त्यात काही समस्या असेल तर दूर बसलेला ऑपरेटर कार नियंत्रित करू शकेल. यादरम्यान, मस्क यांनी असेही सांगितले की, 28 जूनपासून टेस्लाच्या कार फॅक्टरीतुन थेट लोकांच्या घरी पोहोचतील.
कंपनी ग्राहकांच्या सेफ्टीबाबत खूप सावध आहे. जर कारमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर त्याची लाँच डेट देखील बदलली जाऊ शकते. खरंतर, ऑटोनॉमस वाहनांमध्ये म्हणजेच सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांमध्ये सुरक्षितता आणि कडक नियमांमुळे अनेक लोकांचा त्या वाहनांवर विश्वास नसतो.
भारतात पेट्रोल कार्सची सर्वाधिक विक्री, डिझेल, CNG आणि हायब्रिडसह EV ची मार्केटमधील छापही जाणून घ्या
सध्या, टेस्ला त्यांच्या फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) सॉफ्टवेअरच्या नवीन व्हर्जनचा वापर करत आहे, जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. नुकताच एक व्हिडिओ आला आहे ज्यामध्ये टेस्ला मॉडेल Y ड्रायव्हरशिवाय टर्न घेताना दिसत आहे, ज्यावर रोबोटॅक्सी लिहिले होते.
रोबोटॅक्सी हे एक असे वाहन आहे जे ड्रायव्हरशिवाय स्वतःहून चालते. ही कार सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने रस्ते ओळखते आणि प्रवाशांची सुरक्षितता अधिक उत्तम करते. या टॅक्सीची सर्व्हिस स्वस्त असू शकते, कारण त्याला ड्रायव्हरची आवश्यकता नाही.