सध्या देशात सणासुदीचा काळ सुरु आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी भारत सज्ज होत असताना, अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांकडून त्यांच्या गाड्यांवर विशेष ऑफर्स जाहीर केल्या जात आहेत. त्या कंपन्या कारनिर्मात्या असो अथवा दुचाकी निर्मात्या असो. आता यामाहाने (Yamha) ने देशभरातील ग्राहकांसाठी आकर्षक दिवाळी ऑफर जाहीर केल्या आहेत. दिवाळी सणाच्या आनंदात भर घालण्यासाठी, यामाहाकडून आपल्या लोकप्रिय दुचाकी मॉडेल्सवर विशेष कॅशबॅक आणि लोअर डाउन पेमेंट योजना सादर केली जात आहे. ज्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामाहाच्या या योजनेमध्ये त्यांच्या सर्वात लोकप्रिय अशा एफझेड (FZ) मॉडेल्सचाही समावेश आहे.
FZ मॉडेलवर असलेली खास ऑफर
यामाहा 150cc FZ मॉडेल रेंजमध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी कंपनीने फक्त 7,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या लो-डाउन पेमेंट योजना बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे या योजनेसोबतच कंपनीकडून 7,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. यामध्ये FZ-S Fi आवृत्ती 4.0, FZ-S Fi आवृत्ती 3.0 आणि FZ Fi सारख्या मॉडेलचा समावेश आहे. स्पोर्टी लुक, दमदार कामगिरी आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या एफझेड बाइक्स भारतीय खरेदीदारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून पसंतीस उतरल्या आहेत.
यामाहा स्कूटर्सवर असलेल्या खास ऑफर्स
स्कूटर खरेदीदारांसाठी, Yamaha ने त्यांच्या 125cc Fi Hybrid स्कूटरवर विशेष ऑफर आणल्या आहेत. Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid वर फक्त 2,999 रुपयांच्या डाउन पेमेंटवर स्कूटर खरेदी करता येईल तसेच या योजनेसोबतच ग्राहक 4,000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. या हायब्रीड स्कूटर्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे शहरी प्रवासासाठी या स्कूटर एक उत्कृष्ट पर्याय बनतात.
यामाहा कंपनीकडून बाईक्स आणि स्कूटर्सवर देण्यात आलेल्या कमी डाऊन पेंमेंट आणि कॅशबॅक ऑफरमुळे ग्राहकांना दिवाळीनिमित्त दुचाकी खरेदी करण्याचा उत्तम पर्याय मिळाला आहे. तसेच या बाईक्स आणि स्कूटरचे बाजारपेठेत विश्वासार्ह नावही आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही योजना एक चांगली संधी ठरणार आहे.
यामाहाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या बाईक आणि स्कूटर
भारतीय बाजारपेठेतील यामाहाच्या लाइन-अपबद्दल बोलायचे झाले तर त्यात R3, MT-03, R15M, R15 V4, R15S V3, MT-15 V2, आणि FZ-S Fi Ver 4.0, FZ-S Fi Ver 3.0 सारख्या FZ मालिका बाइक्सचा समावेश आहे. FZ Fi, आणि FZ-X. याशिवाय, Yamaha Aerox 155 आवृत्ती S, Aerox 155, Fascino S 125 Fi Hybrid, Fascino 125 Fi Hybrid, RayZR 125 Fi Hybrid, आणि RayZR स्ट्रीट रॅली 125 Fi Hybrid यासह स्कूटरच्या रेंज कंपनीकडून उपलब्ध केल्या आहेत.