भारतात Audi Q7 Signature Edition लाँच
भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कार्सला देखील चांगली मागणी मिळताना दिसते. अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेते आणि उच्च उत्पन्न असणारे लोकांच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्स समाविष्ट असतातच. लक्झरी कार्सच्या विक्रीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. अशातच आता Audi ने आपली नवीन कार लाँच केली आहे.
जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने त्यांच्या प्रतिष्ठित फ्लॅगशिप एसयूव्हीचे एक खास व्हर्जन ऑडी Q7 सिग्नेचर एडिशन भारतात लाँच केली आहे. तब्बल 99,81,000 (एक्स-शोरूम) पासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली ही लिमिटेड एडिशन SUV लक्झरी प्रेमींना खास अनुभव देईल. प्रीमियम डिझाइन, नाविन्यपूर्ण टेक्नोलॉजी आणि दर्जेदार इन-कार सुविधांमुळे ही SUV अधिक आकर्षक झाली आहे.
Q7 सिग्नेचर एडिशनमध्ये ऑडी रिंग्ज एंट्री एलईडी लॅम्प्स, डायनॅमिक व्हील हब कॅप्स आणि अनोखी इस्प्रेसो मोबाइल इन-व्हेईकल कॉफी सिस्टीमसारखी विशेष फीचर्स दिली गेली आहेत. ही कार साखीर गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, ग्लेशियर व्हाईट आणि समुराई ग्रे या पाच आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.
भारतातील अनेक शहरांमध्ये Vinfast च्या कार शोकेस, लवकरच मिळणार आकर्षक कारची डिलिव्हरी
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लों यांनी सांगितले, “ऑडी Q7 ने लक्झरी SUV सेगमेंटमध्ये उच्च मानदंड प्रस्थापित केले आहेत. सिग्नेचर एडिशनमधील नवीन घटक आमच्या ग्राहकांसाठी विशेष मालकीचा अनुभव सादर करतात. हे वाहन ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.”
ऑडी रिंग्ज एंट्री एलईडी लाइट्स – वेलकम प्रोजेक्शनसह
डायनॅमिक व्हील हब कॅप्स – चालू असताना स्थिर ऑडी लोगो
मेटॅलिक की कव्हर आणि स्टेनलेस स्टील पेडल कव्हर्स
इन-व्हेईकल इस्प्रेसो मशीन
ऑडी डॅशकॅमसह ट्रॅफिक रेकॉर्डर
विशेष पेंट डिझाइनसह R20 अलॉय व्हील्स
Q7 सिग्नेचर एडिशनमध्ये 3.0 लिटर V6 TFSI इंजिन असून ते 340 HP आणि 500 Nm टॉर्क निर्माण करते. हे 48 व्होल्ट माइल्ड-हायब्रीड टेक्नोलॉजीसह येते. SUV केवळ 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी/तास गती पकडते. क्वॉट्रो ऑल व्हील ड्राईव्ह, 7 ड्रायव्हिंग मोड्स, अॅडप्टिव्ह एअर सस्पेन्शन आणि 8-स्पीड ट्रिपट्रॉनिक गिअरबॉक्ससह ही SUV सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी योग्य आहे.
फक्त 50,000 रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये हातात येईल Tata Nexon ची चावी, ‘असा’ EMI चा सोपा हिशोब
7-सीटर केबिन, फोल्डेबल थर्ड-रो सीट्स, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, MMI टच नेव्हिगेशन, वायरलेस चार्जिंग, बँग अँड ओलुफ्सेन 3D साउंड सिस्टीमसह 19 स्पीकर्स, 360 डिग्री कॅमेरा, लेन डिपार्चर वॉर्निंग, 8 एअरबॅग्ज आणि इलेक्टॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम यामुळे आराम, मनोरंजन व सुरक्षिततेचा परिपूर्ण अनुभव मिळतो.