Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्झरी SUV Audi SQ8 च्या बुकिंगला सुरुवात! ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्याची शक्यता

लक्झरी कार उत्पादक कंपनी Audi ने त्यांची नवीन एसयूव्ही Audi SQ8 च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 10:16 PM
फोटो सौजन्य: @khuleonwheels/ X.com

फोटो सौजन्य: @khuleonwheels/ X.com

Follow Us
Follow Us:
  • Audi SQ8 ची बुकिंग सुरु
  • 17 मार्चला भारतात लाँच होणार
  • जाणून घ्या इंजिन आणि फीचर्सची माहिती
जर्मन लक्झरी कार निर्माता Audi ने आपल्या नव्या परफॉर्मन्स SUV Audi SQ8 च्या अधिकृत लाँचपूर्वीच भारतात तिची बुकिंग सुरू केली आहे. कंपनी ही दमदार एसयूव्ही 17 मार्च 2026 रोजी अधिकृतपणे लाँच करणार आहे. ही प्रीमियम SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 5 लाख रुपयांची टोकन रक्कम भरून ती आधीच बुक करता येणार आहे. बुकिंगची सुविधा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच myAudi Connect अ‍ॅपद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात Audi SQ8 ला कंपनीच्या Q8 लाइन-अपमधील अधिक स्पोर्टी आणि परफॉर्मन्स-ओरिएंटेड मॉडेल म्हणून सादर केले जाणार आहे. ही SUV स्टँडर्ड Audi Q8 आणि टॉप-स्पेक Audi RS Q8 यांच्या मधल्या स्थानावर ठेवली जाईल. तिची अधिकृत किंमत लाँच इव्हेंटदरम्यान जाहीर केली जाणार असून हा कार्यक्रम दिल्ली येथे होणार आहे.

Hyundai Creta की Toyota Hyryder, 50 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार बेस्ट?

दमदार इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मन्स

नवी Audi SQ8 एक हाय-परफॉर्मन्स SUV म्हणून तयार करण्यात आली आहे. या SUV मध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 TFSI पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन सुमारे 500hp पॉवर आणि 770Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच Audi चे प्रसिद्ध quattro ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमही यात मिळते, ज्यामुळे चारही चाकांना प्रभावीपणे पॉवर मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार ही SUV केवळ 4.1 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. तर तिचा टॉप स्पीड 250 किमी/ताशी इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिक उत्तम ड्रायव्हिंग अनुभवासाठी यात अॅडॅप्टिव्ह एअर सस्पेन्शन आणि ऑल-व्हील स्टीयरिंगसारखी आधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत.

टर्बो हायब्रीड इंजिन, 1030 हॉर्सपॉवर अन् 10 कोटींची किंमत; भारतात Ferrari ची नवी सुपरकार सादर

डिझाइनमध्ये अधिक स्पोर्टी अपील

Audi SQ8 चे डिझाइन स्टँडर्ड Q8 च्या तुलनेत अधिक आक्रमक, आकर्षक आणि स्पोर्टी ठेवण्यात आले आहे. यात मोठे एअर इंटेक्स, S-स्पेसिफिक बॅजिंग, मॅट सिल्व्हर एक्स्टेरियर एलिमेंट्स आणि क्वाड एग्झॉस्ट टिप्स देण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या आकाराचे अलॉय व्हील्स तिच्या लूकला अधिक दमदार बनवतात. कूपे-स्टाइल डिझाइनमुळे ही SUV एकाच वेळी प्रीमियम आणि स्पोर्टी अशी दुहेरी ओळख निर्माण करते.

प्रीमियम आणि टेक्नॉलॉजीने सजलेले इंटीरियर

Audi SQ8 चे केबिनही अत्यंत प्रीमियम आणि आधुनिक पद्धतीने डिझाइन केले गेले आहे. यात अलकांतारा आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा वापर करण्यात आला आहे. डॅशबोर्डवर दोन 12.3-इंच स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यापैकी एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी तर दुसरी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी वापरली जाते. याशिवाय या SUV मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टेबल सीट्स, हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शनसारखे अनेक लक्झरी फीचर्सही देण्यात आले आहेत.

Web Title: Audi sq8 booking started new suv will be launching on 17 march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:16 PM

Topics:  

  • Audi
  • automobile
  • SUV

संबंधित बातम्या

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!
1

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?
2

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!
3

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
4

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.