Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 मार्चला Audi-Tesla चे धाबे दणाणार! BMW च्या ‘या’ कारची एंट्री होणार; मिळणार प्रीमियम फीचर्स

BMW येत्या 18 मार्चला त्याची नवीन इलेक्ट्रिक सेडान Neue Klasse i3 लाँच करण्याच्या तयारुत आहेत. ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज झाल्यास थेट 805 किमीची रेंज देणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 03:56 PM
फोटो सौजन्य: X.com/@BMW

फोटो सौजन्य: X.com/@BMW

Follow Us
Follow Us:
  • BMW ची नवीन इलेक्ट्रिक सेडान कार होणार लाँच
  • थेट देणार 805 किमीची रेंज
  • कोणत्या कारसोबत असणार स्पर्धा?
भारतासह जगभरात अनेक लक्झरी वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या दमदार कार्स ऑफर करत आहे. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी BMW. या कंपनीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. आता कंपनी त्यांची इलेक्ट्रिक सेडान कार लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

येत्या 18 मार्च 2026 रोजी BMW त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार BMW Neue Klasse i3 जागतिक स्तरावर सादर करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीच्या नवीन Neue Klasse सिरींजमधील दुसरी कार असून यापूर्वी या मालिकेतली BMW iX3 ही SUV सादर करण्यात आली होती. नवीन i3 ही प्रत्यक्षात BMW 3 Series या लोकप्रिय सेडानचे इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. यापूर्वी i3 हे नाव एका छोट्या हॅचबॅक कारसाठी वापरले जात होते, मात्र ती कार 2022 मध्ये बंद करण्यात आली होती.

15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

दमदार बॅटरी आणि रेंज

Autocar India च्या अहवालानुसार, या कारमध्ये सुमारे 108 kWh NMC बॅटरी पॅक देण्यात येण्याची शक्यता आहे, जो ड्युअल मोटर सेटअपसह येऊ शकतो. BMW iX3 मध्ये ही बॅटरी 569hp पॉवर आणि 645Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार iX3 ची WLTP रेंज 805 किमी पर्यंत आहे. सेडान कारमध्ये SUV च्या तुलनेत एरोडायनामिक ड्रॅग कमी असल्यामुळे नवीन i3 एका चार्जमध्ये iX3 पेक्षा अधिक अंतर पार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुपरफास्ट चार्जिंग

नवीन i3 ही BMW च्या अत्याधुनिक बॅटरी आर्किटेक्चरवर आधारित आहे. या EV मध्ये 400kW पर्यंत DC फास्ट चार्जिंग आणि 22kW पर्यंत AC चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय या कारमध्ये BMW ची Heart of Joy कंट्रोल युनिट देण्यात येणार आहे, जी BMW Dynamic Performance Control सिस्टमसह काम करत ड्रायव्हिंगशी संबंधित सर्व प्रक्रिया मिलिसेकंदात नियंत्रित करते.

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

कसा असेल नवीन i3 चा लुक?

2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या BMW Vision Neue Klasse कॉन्सेप्ट कारमधून या i3 च्या डिझाइनची झलक मिळाली होती. कारच्या पुढील भागात BMW ची सिग्नेचर किडनी ग्रिल असेल, जी आता LED लाइट्ससह आकर्षक दिसणार आहे. याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या IAA Mobility Show मध्ये i3 चा प्री-प्रोडक्शन प्रोटोटाइपही सादर करण्यात आला होता.

या कारचे बॉडी पॅनेल कॉन्सेप्टच्या तुलनेत अधिक स्मूथ असतील आणि C-पिलरवरील BMW ची खास हॉफमिस्टर किंक डिझाइन कायम ठेवण्यात येणार आहे. मागील बाजूस Vision Neue Klasse प्रमाणे ट्रेपेजॉइडल टेल-लॅम्प मिळू शकतात.

कसे असेल इंटीरियर?

या कारचे इंटीरियर साधे पण अत्याधुनिक असेल, ज्याची झलक BMW iX3 मध्येही पाहायला मिळते. यामध्ये एक खास पॅनोरामिक डिस्प्ले दिला जाईल जो कारच्या विंडस्क्रीनच्या संपूर्ण रुंदीपर्यंत पसरलेला असेल. मनोरंजन आणि वाहनाच्या सेटिंग्ससाठी 17.9 इंचाची मोठी टचस्क्रीन देण्यात येईल, जी BMW च्या नवीन OS X ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

कोणत्या कारशी असेल स्पर्धा?

नवीन i3 च्या माध्यमातून BMW जागतिक EV सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा देण्याच्या तयारीत आहे. या कारची थेट स्पर्धा Audi A4 e‑tron,Tesla Model 3 आणि Mercedes‑Benz C‑Class EV यांसारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक कार्सशी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Audi tesla rival bmw new electric car bmw neue klasse i3 launch globally on 18th march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • electric car

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.