
राकेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, नवीन ब्रँडच्या माध्यमातून 125cc ते 250cc सेगमेंटमधील वेगवेगळ्या सब-सेगमेंटमधील कस्टमर्सना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. हे दोन्ही ब्रँड संपूर्ण इंजिन सेगमेंट कव्हर करणार नाहीत, तर वेगवेगळ्या गरजांनुसार स्वतंत्र प्रोडक्ट्स सादर करतील. यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या Q1 FY2027 चर्चेदरम्यान कंपनीने 125cc सेगमेंटसाठी 2 नवीन ब्रँड आणण्याचे संकेत दिले होते. 100cc बाईक वापरणाऱ्या कस्टमर्सन पुढील सेगमेंटकडे वळवण्याचाही कंपनीचा विचार आहे.
गेल्या वर्षी 125cc आणि 150cc पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकल सेगमेंटमध्ये बजाजचा मार्केट शेअर कमी झाला होता. कंपनीच्या काही जुन्या मॉडेल्सचे प्रोडक्ट लाइफ सायकल संपण्याच्या टप्प्यावर असल्याने विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे बजाजने पल्सर NS आणि N सीरिजवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही सीरिजमधील नवीन अपडेटेड मॉडेल्सना मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले. दुसरीकडे, जुन्या क्लासिक पल्सर आणि 100cc सेगमेंटमधील विक्रीमुळे कंपनीच्या एकूण मार्केट शेअरवर परिणाम झाला आहे.
बजाज ट्रेकर अॅडव्हेंचर बाईक 2027 मध्ये येणार? 250cc इंजिन, TFT स्क्रीन आणि स्पोक व्हील्सची खासियत!
बजाजने अलीकडच्या काही आठवड्यांत पल्सर 125, पल्सर 150, पल्सर N160 S, N160 SS, NS400Z, N250SS आणि NS200 यांसारखी नवीन ,अपडेटेड मॉडेल्स सादर केली आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, या नवीन मॉडेल्सचा 125cc पेक्षा जास्त क्षमतेच्या पोर्टफोलिओमधील वाटा ऑगस्टमध्ये 7 टक्के, सप्टेंबरमध्ये 26 टक्के आणि फेस्टिव्ह सीझनच्या पहिल्या 16 दिवसांत 33 टक्क्यांवर पोहोचला.
दरम्यान, आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत बजाजची परदेशातील वाहन निर्यात वर्षभराच्या तुलनेत 41 टक्क्यांनी वाढून सुमारे 7.8 लाख युनिट्सवर पोहोचली. आफ्रिकेतील निर्यातीत 83 टक्के, तर लॅटिन अमेरिकेतील निर्यातीत 44 टक्के वाढ झाली. भविष्यात नवीन सेगमेंट, नवीन देश आणि KTM सोबतच्या पार्टनरशिपच्या माध्यमातून जागतिक विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
बजाज पल्सर N250SS लाँच! 1.59 लाख रुपये किंमत, TFT डिस्प्ले, 6-स्पीड गिअरबॉक्ससह मिळणार दमदार फीचर्स
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: बजाज ऑटो किती नवीन मोटरसायकल ब्रँड लाँच करणार आहे?
उत्तर: बजाज ऑटो आर्थिक वर्ष 2027 मध्ये 2 नवीन मोटरसायकल ब्रँड सादर करणार आहे. हे ब्रँड 125cc ते 250cc सेगमेंटवर लक्ष केंद्रित करतील.
प्रश्न 2: बजाजचे नवीन मोटरसायकल ब्रँड कोणत्या सेगमेंटमध्ये येणार आहेत?
उत्तर: हे नवीन ब्रँड 125cc ते 250cc सेगमेंटमधील वेगवेगळ्या सब-सेगमेंटसाठी तयार केले जाणार आहेत. भारतासह आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही त्यांची विक्री होईल.
प्रश्न 3: बजाज पल्सरच्या कोणत्या नवीन मॉडेल्सची घोषणा किंवा अपडेट करण्यात आले आहे?
उत्तर: कंपनीने अलीकडे पल्सर 125, पल्सर 150, N160 S, N160 SS, NS400Z, N250SS आणि NS200 यांसारखी नवीन किंवा अपडेटेड मॉडेल्स सादर केली आहेत.