Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!

रॉयल एनफिल्ड यंदा भारतीय मार्केटमध्ये Himalayan 440 आणि Himalayan 750 या दोन महत्त्वाच्या अॅडव्हेंचर बाईक्स सादर करण्याच्या बेतात आहे. Himalayan 440 ही कंपनीच्या Scram 440 आणि Himalayan 450 यांच्या मधल्या श्रेणीत स्थान मिळवेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 09, 2026 | 04:00 PM
बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!
Follow Us
Follow Us:

भारतातील दुचाकी बाजारात अॅडव्हेंचर मोटारसायकलींची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, खराब रस्त्यांवर सहज धावण्यासाठी आणि ऑफ-रोडिंगचा अनुभव घेण्यासाठी अनेक ग्राहक आता अॅडव्हेंचर बाईककडे वळत आहेत. सध्या KTM 390 Adventure, Royal Enfield Himalayan 450 आणि BMW F 450 GS सारख्या मॉडेल्सनी या सेगमेंटमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत हे मार्केट आणखी रंगतदार होणार आहे. कारण बजाज, रॉयल एनफिल्ड आणि टीव्हीएसच्या मालकीची ब्रिटिश कंपनी नॉर्टन मोटरसायकल्स या क्षेत्रात नव्या मॉडेल्ससह प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

रॉयल एनफिल्ड यंदा भारतीय मार्केटमध्ये Himalayan 440 आणि Himalayan 750 या दोन महत्त्वाच्या अॅडव्हेंचर बाईक्स सादर करण्याच्या बेतात आहे. Himalayan 440 ही कंपनीच्या Scram 440 आणि Himalayan 450 यांच्या मधल्या श्रेणीत स्थान मिळवेल. या बाईकमध्ये Scram 440 चेच इंजिन आणि प्लॅटफॉर्म वापरला जाणार असला तरी तिची रचना जुन्या Himalayan 411 पासून प्रेरित असेल. त्यामुळे पारंपरिक हिमालयन चाहत्यांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच …

दुसरीकडे, Himalayan 750 ही रॉयल एनफिल्डची आतापर्यंतची सर्वात प्रगत अॅडव्हेंचर बाईक मानली जात आहे. नुकतीच तिची चाचणी तामिळनाडूमध्ये कंपनीच्या उत्पादन केंद्राजवळ पाहायला मिळाली. ही बाईक 2026 मधील इटलीतील प्रतिष्ठित EICMA मोटर शोमध्ये जागतिक स्तरावर पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रॉयल एनफिल्डच्या इतिहासात प्रथमच या बाईकला पुढे ड्युअल डिस्क ब्रेक्स मिळणार आहेत. नव्याने विकसित केलेले 750 सीसी ट्विन-सिलेंडर एअर/ऑइल-कूल्ड इंजिन सुमारे 55 ते 60 बीएचपी शक्ती निर्माण करू शकते.

दरम्यान, बजाज ऑटो देखील अॅडव्हेंचर सेगमेंटमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीची नवीन अॅडव्हेंचर मोटारसायकल नुकतीच भारतीय रस्त्यांवर चाचणीदरम्यान दिसली. तिची रचना KTM 390 Enduro सारखी असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. ही बाईक 2026 च्या अखेरीस बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. चाचणीदरम्यान ती Pulsar N250 सोबत दिसल्याने या नवीन बाईकमध्ये त्याच 249 सीसी सिंगल-सिलेंडर ऑइल-कूल्ड इंजिनचा वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे इंजिन 24.1 बीएचपी शक्ती आणि 21.5 एनएम टॉर्क निर्माण करते.

एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत …

ब्रिटिश ब्रँड नॉर्टन मोटरसायकल्स, जो आता टीव्हीएस मोटर कंपनीच्या मालकीचा आहे, तोही भारतात Atlas आणि Atlas GT या दोन अॅडव्हेंचर बाईक्स आणणार आहे. या दोन्ही मोटारसायकली तामिळनाडूमधील टीव्हीएसच्या कारखान्यात तयार केल्या जाणार आहेत. Atlas GT ही अधिक रोड-बायस्ड टूरिंग आवृत्ती असेल. तिला 17-इंच अलॉय व्हील्स आणि रस्त्यांसाठी योग्य टायर्स मिळतील, तर स्टँडर्ड Atlas मध्ये 19-इंच पुढील आणि 17-इंच मागील वायर-स्पोक व्हील्स असतील.

दोन्ही नॉर्टन बाईक्समध्ये 585 सीसी पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाईल. हे इंजिन सुमारे 70 बीएचपी शक्ती निर्माण करेल आणि 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत स्लिप-अँड-असिस्ट क्लचची सुविधाही देईल.

एकंदरीत, भारतातील अॅडव्हेंचर बाईक सेगमेंट पुढील दोन वर्षांत अधिक स्पर्धात्मक आणि रोमांचक होणार आहे. रॉयल एनफिल्ड, बजाज आणि नॉर्टनच्या नव्या मॉडेल्समुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील, तर देशातील अॅडव्हेंचर पर्यटन संस्कृतीलाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Bajaj nortanroyal enfield new adventure bikes launch auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात मोठे आणि भव्य ऑटोमोबाईल शोरूम! जाणून घ्या
1

‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात मोठे आणि भव्य ऑटोमोबाईल शोरूम! जाणून घ्या

जगातील 10 सर्वात श्रीमंत लोकांच्या या आहेत आवडत्या कार! आत्ताच जाणून घ्या
2

जगातील 10 सर्वात श्रीमंत लोकांच्या या आहेत आवडत्या कार! आत्ताच जाणून घ्या

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
3

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!
4

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.