Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ आणि वेगवान परफॉर्मन्स ; फरारी ‘अमाल्फी स्पायडर’च्या ‘टॉप फीचर्स’वर एक नजर!

फेरारीने आपली पावरफुल V8 इंजिन असणारी नवीन लक्झरी कन्व्हर्टेबल कार 'अमाल्फी स्पायडर' भारतात ₹४.६ कोटींमध्ये लॉन्च केली आहे. केवळ १३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ आणि हायटेक फीचर्स असलेली ही कार ग्राहकांसाठी मुंबई, दिल्ली व बंगळुरू येथे शोकेससाठी उपलब्ध केली गेली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 19, 2026 | 02:28 PM
१३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ आणि वेगवान परफॉर्मन्स ; फरारी ‘अमाल्फी स्पायडर’च्या ‘टॉप फीचर्स’वर एक नजर!
Follow Us
Follow Us:

दमदार परफॉर्मन्ससह शक्तिशाली V8 इंजिन

अमाल्फी स्पायडरमध्ये कुप मॉडेलसारखेच इंजिन वापरण्यात आले आहे. फरारीने यात कोणताही यांत्रिक बदल केलेला नाही, त्यामुळे छताच्या यंत्रणेमुळे वजन वाढले असले तरी ग्राहकांना कुपसारखाच चांगला परफॉर्मन्स मिळतो. या कारमध्ये ३.९ लीटरचे ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते ६४० hp पॉवर आणि ७६० Nm टॉर्क निर्माण करते. यात ८-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि रिअर-व्हील ड्राईव्ह सिस्टीम मिळते. ही कार अवघ्या ३.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड ३२० किमी प्रतितास आहे. स्पायडरचे वजन कुपपेक्षा सुमारे ८६ किलोग्रॅम जास्त असले, तरी कारच्या कामगिरीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

अवघ्या १३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ

या कारमधील सर्वात मोठा बदल म्हणजे तिचे इलेक्ट्रिकली ऑपरेटेड सॉफ्ट रूफ. हे रुफ अवघ्या १३.५ सेकंदात उघडता किंवा बंद करता येते आणि कार ६० किमी प्रतितास वेगाने धावत असतानाही हे छत ऑपरेट केले जाऊ शकते. फरारी ग्राहकांसाठी विविध रंगांचे रूफ पर्याय देत आहे. याचे पाच-लेअर फॅब्रिक छतामुळे केबिनमध्ये उष्णता आणि बाहेरील आवाज येत नाही. तसेच, ओपन-रूफ ड्रायव्हिंग दरम्यान केबिनमधील हवेचा प्रवाह कमी करण्यासाठी कंपनीने मागील सीटच्या मागे विंड डिफ्लेक्टर देखील जोडला आहे. रुफ बंद असताना २५५ लीटर आणि रुफ फोल्ड केल्यावर १७२ लीटरची डिक्की मिळते.

आधुनिक फीचर्सनी सज्ज असे केबिन

या कारचे इंटेरियर फेरारीच्या ड्युअल कॉकपिट डिझाइन वर आधारित असून यात २+२ सीटींग लेआउट मिळतो. ग्राहकांसाठी यात स्टीयरिंग व्हीलवर फिजिकल कंट्रोल्ससह भरपूर तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कारमध्ये १५.६ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि पॅसेंजरसाठी स्वतंत्र ८.८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याशिवाय वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, वायरलेस फोन चार्जर, पॉवर्ड स्पोर्ट्स सीट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स मिळतात. सुरक्षेसाठी यात ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि कस्टमायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!

भारतातील उपस्थिती वाढवण्यावर फरारीचा भर

फरारीने आपल्या अधिकृत डीलर पार्टनर्सच्या माध्यमातून मुंबई, नवी दिल्ली आणि बेंगळुरू येथे खास ग्राहक शोकेस आयोजित करून अमाल्फी स्पायडरच्या लॉन्चिंगला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांमुळे ग्राहकांना कारची डिलिव्हरी भारतात सुरू होण्यापूर्वीच कारचे डिझाइन, फीचर्स आणि पर्सनलायझेशन पर्याय जवळून अनुभवता येणार आहेत.

Web Title: Ferrari amalfi spider top features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • automobile
  • ferrari

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.