Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकमधून आवाज येतोय? जाणून घ्या कारणे आणि अगदी सोपे उपाय

पावसाळ्यात चिखल, धूळ आणि गंज चढल्यामुळे बाईकच्या ब्रेकमधून कर्कश आवाज येतो, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होऊ शकतो. ब्रेकची नियमित स्वच्छता ठेवून, सँडपेपरने गंज साफ करून किंवा झिजलेले ब्रेक पॅड्स वेळेवर बदलून या समस्येपासून सहज सुटका मिळवता येते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 19, 2026 | 04:39 PM
पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकमधून आवाज येतोय? जाणून घ्या कारणे आणि अगदी सोपे उपाय
Follow Us
Follow Us:

पावसाळा सुरू झाला की गाड्यांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यातीलच एक सामान्य समस्या म्हणजे बाईक चालवताना ब्रेक लावल्यावर येणारा कर्कश आवाज. हा आवाज केवळ त्रासदायक नसून, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या बाईकमधून येनार्या आवाजामागाची कारणे आणि त्यावरचे तोडगे आज आपण इथे समजून घेऊयात,

ब्रेकमधून आवाज येण्याची मुख्य कारणे-

धूळ आणि चिखल जमा होणे

पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी, चिखल आणि बारीक वाळूचे कण ब्रेक लायनर ड्रम किंवा डिस्क प्लेटवर जमा होतात. यामुळे ब्रेक लावताना घर्षण होऊन मोठा आवाज येतो.

डिस्क प्लेटवर गंज चढणे

पावसामुळे हवेत कमालीचा ओलसरपणा असतो. जर बाईक काही दिवस एकाच ठिकाणी उभी असेल, तर डिस्क प्लेटवर गंज चढतो. हा गंज ब्रेक पॅडला घासल्यामुळे आवाज येतो.

१३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ आणि वेगवान परफॉर्मन्स ; फरारी ‘अमाल्फी स्पायडर’च्या ‘टॉप फीचर्स’वर एक नजर!

ब्रेक पॅड्स खराब होणे

पाणी आणि चिखलामुळे ब्रेक पॅड्स लवकर झिजतात. पॅड्स पूर्णपणे झिजल्यास आतील धातू थेट डिस्कला घासतो, ज्यामुळे मोठा आवाज येतो.

या समस्येवरचे अगदी सोपे उपाय-

ब्रेकची नियमित स्वच्छता ठेवा

बाईक पावसात फिरवून आल्यानंतर ब्रेकवर स्वच्छ पाणी मारून चिखल धुवून टाका. आठवड्यातून एकदा ब्रेक पार्ट स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

सँडपेपरचा वापर करा

ड्रम किंवा डिस्क प्लेटवर गंज किंवा चिखल साचला असल्यास, मेकॅनिक कडून किंवा स्वतः सँडपेपरने ते हलके घासून स्वच्छ करा. यामुळे आवाज लगेच बंद होतो.

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

ब्रेक पॅड्स बदला

जर ब्रेक पॅड्स पूर्णपणे झिजले असतील, तर वेळ न घालवता ते तातडीने बदलून घ्या. यामुळे डिस्क प्लेट खराब होण्यापासून वाचेल.

ब्रेकसाठी योग्य लुब्रिकेशन वापरा

ब्रेकच्या केवळ मूव्हिंग पार्ट्सवर योग्य ऑईल किंवा ग्रीस लावा. लक्षात ठेवा, ब्रेक शू किंवा डिस्क प्लेटवर चुकूनही तेल पडणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा ब्रेक लागणे बंद होईल.

पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी ब्रेकची स्थिती उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असा आवाज आल्यास वरील उपाय नक्की करून पहा!

Web Title: Breaks rough sounds in rainy season tips solutions auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • automobile
  • Monsoon

संबंधित बातम्या

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
1

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
2

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
3

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
4

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.