Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज पल्सर 125 निऑनची पुन्हा एन्ट्री! डीलरशिपमध्ये दिसली जुनी बाइक, किंमतही कमी असणार?

Bajaj Pulsar 125 Neon पुन्हा भारतीय मार्केटमध्ये परतण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील डीलरशिपमध्ये ही बाइक दिसली असून जुन्या ट्विन शॉक सस्पेन्शन आणि नव्या ग्राफिक्ससह तिची एन्ट्री होऊ शकते. नवीन पल्सरपेक्षा कमी किंमत असेल का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 23, 2026 | 08:34 AM
Bajaj Pulsar 125 Neon Expected Return to India (फोटो सौजन्य-AI एआय)

Bajaj Pulsar 125 Neon Expected Return to India (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • बजाज पल्सर 125 निऑन तामिळनाडूमधील कृष्णगिरी येथील डीलरशिपमध्ये नव्या ग्राफिक्ससह दिसली आहे.
  • बाइकमध्ये 124.4cc इंजिन, 5-स्पीड गिअरबॉक्स आणि ट्विन रिअर शॉक अॅब्झॉर्बर्स मिळण्याची शक्यता आहे.
  • नवीन पल्सर 125 पेक्षा निऑन मॉडेलची किंमत कमी असण्याची शक्यता असून लाँचची तारीख जाहीर झालेली नाही.

Bajaj Pulsar 125 Neon पुन्हा भारतीय दुचाकी मार्केटमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. ही बाइक तामिळनाडूमधील कृष्णगिरी येथील एका डीलरशिपमध्ये दिसली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट 2026 मध्ये बजाज ऑटोने नवीन जनरेशनची पल्सर 125 सादर केली होती. पण आता जुन्या डिझाइनमधील पल्सर 125 निऑन परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन मॉडेलच्या तुलनेत कमी किंमतीत पल्सर खरेदी करू इच्छिणाऱ्या कस्टमर्ससाठी हा ऑप्शन चांगला ठरू शकतो.

जुन्या डिझाइनमध्ये नवीन ग्राफिक्स

डीलरशिपमध्ये दिसलेल्या बाइकला ब्लॅक कलर देण्यात आला असून त्यावर लाल आणि निळ्या रंगाचे ग्राफिक्स यावर दिसतात. फ्युल टँकची मस्क्युलर स्ट्रक्चर, टँक एक्स्टेंशन आणि पल्सरची ओळख असलेली बिकीनी फेअरिंग कायम ठेवण्यात आली आहे. अलॉय व्हील्सवरही याच रंगांचे आकर्षक ग्राफिक्स दिसतात. त्यामुळे बाइकचा जुना लूक कायम ठेवत ग्राफिक्समध्ये बदल करण्यात आल्याचे दिसते.

2026 बजाज पल्सर NS125 मध्ये TFT डिस्प्लेची एन्ट्री; Google Maps नेव्हिगेशनसह नवी बाइक येणार!

सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सेटअप

नवीन जनरेशनच्या पल्सर 125 मध्ये मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. पण निऑन मॉडेलमध्ये पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स मिळतात. याशिवाय फ्रंट डिस्क ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक, सिंगल पीस सीट, पारंपरिक ग्रॅब रेल आणि चेन कव्हर देण्यात आले आहे. हेडलॅम्पची जुनी रचना कायम असून इंडिकेटर्सही ट्रेडीशनल प्रकारचे आहेत. इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये काही बदल होणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

124.4cc इंजिन मिळण्याची शक्यता

या बाइकमध्ये आधीप्रमाणे 124.4cc सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क तयार करत होते. त्याला 5-स्पीड गिअरबॉक्सची जोड होती. पण नवीन मॉडेलमध्येही हेच इंजिन स्पेसिफिकेशन कायम राहणार का, याबाबत बजाजने माहिती दिलेली नाही.

Bajaj Chetak EV ची 10 लाख विक्री पार! इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये बजाजचा मोठा टप्पा

दुसरीकडे, नवीन जनरेशनच्या पल्सर 125 मध्ये 124.58cc इंजिन असून ते 12 PS पॉवर आणि 11 Nm टॉर्क देते. यात नवीन डायमंड फ्रेम, मोनोशॉक सस्पेन्शन, राइड मोड्स आणि गुगल मॅप्स नेव्हिगेशनसह 5-इंच TFT डिस्प्ले मिळतो.

किंमत किती असणार?

नवीन जनरेशनच्या बजाज पल्सर 125 ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 92,900 रुपये आहे. जुन्या निऑन मॉडेलची किंमत यापेक्षा कमी ठेवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे कमी बजेटमध्ये पल्सर खरेदी करू इच्छिणाऱ्या कस्टमर्सना फायदा होऊ शकतो. पण बजाजने या बाइकची किंमत आणि लाँचची तारीख अजून जाहीर केलेली नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बजाज पल्सर 125 निऑन पुन्हा लाँच होणार आहे का?

    Ans: बजाज पल्सर 125 निऑन पुन्हा बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. ही बाइक तामिळनाडूमधील कृष्णगिरी येथील डीलरशिपमध्ये दिसली आहे. पण कंपनीने लाँचबाबत ऑफीशली घोषणा केलेली नाही.

  • Que: बजाज पल्सर 125 निऑनमध्ये कोणते इंजिन मिळणार?

    Ans: या बाइकला 124.4cc सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मॉडेलमध्ये हे इंजिन 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क देत होते.

  • Que: बजाज पल्सर 125 निऑनची किंमत किती असेल?

    Ans: नवीन पल्सर 125 ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 92,900 रुपये आहे. निऑन मॉडेलची किंमत यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. पण बजाजने किंमत जाहीर केलेली नाही.

Web Title: Bajaj pulsar 125 neon comeback new bike india launch auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes

संबंधित बातम्या

मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा!
1

मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा!

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स
2

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास
3

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे
4

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.