Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटर बंगळुरूमध्ये टेस्टिंगदरम्यान दिसली असून 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. 14-इंची चाके, उंच विंडस्क्रीन आणि लगेज रॅकची सोय मिळू शकते. पण या स्कूटरमध्ये रिव्हर इंडीची 160km रेंज कायम राहणार की नवीन बॅटरी मिळणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 22, 2026 | 02:29 PM
River RX02 Electric Scooter Testing and India Launch (फोटो सौजन्य-AI एआय)

River RX02 Electric Scooter Testing and India Launch (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटर बंगळुरूमध्ये टेस्टिंगदरम्यान दिसली असून 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
  • स्कूटरमध्ये उंच विंडस्क्रीन, 14-इंची चाके आणि सामान ठेवण्यासाठी लगेज रॅक मिळू शकतो.
  • रिव्हर इंडीमध्ये 4kWh बॅटरी, 160km रेंज आणि 90kmph टॉप स्पीड मिळतो.

River RX02 Electric Scooter भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान दिसली असून 2027 मध्ये तिचे लाँच होण्याची शक्यता आहे. River RX02 ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या River Indie मॉडेलवर आधारित असण्याची शक्यता आहे. पण यामध्ये मागच्या भागाचे नवीन डिझाइन, सामान ठेवण्यासाठी रॅकची सोय आणि उंच विंडस्क्रीन असे बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये कंपनीचा नवा प्रयोग ठरू शकतो.

रिव्हर मोबिलिटी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच या स्कूटरची बंगळुरूमधील रस्त्यांवर टेस्टिंग सुरू असल्याचे दिसले. टेस्टिंगदरम्यान स्कूटर पूर्णपणे कॅमोफ्लाज करण्यात आली होती. त्यामुळे तिचे संपूर्ण डिझाइन समोर आलेले नाही. पण समोरचा अॅप्रॉन, फ्लोअरबोर्ड, मिरर आणि टर्न इंडिकेटर्स यांसारखे काही भाग रिव्हर इंडीसारखे दिसतात. यामध्ये 14-इंची मोठी चाके आणि मागच्या बाजूला ट्विन शॉक अॅब्जॉर्बर्स मिळण्याची शक्यता आहे.

PM E-DRIVE Scheme: देशात 30 लाखांहून जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री; 8,610 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी!

मागच्या डिझाइनमध्ये काय बदल?

रिव्हर RX02 मध्ये मागच्या बाजूला नवीन स्लिम LED टेललाइट बार दिल्याचे दिसते. सध्याच्या रिव्हर इंडीमधील मोठ्या टेललॅम्पऐवजी हा वेगळा सेटअप असू शकतो. तसेच पिलियन ग्रॅब रेलमध्ये सामान ठेवण्यासाठी रॅक बसवण्याची सोय दिसते. त्यामुळे टॉप बॉक्स किंवा अतिरिक्त लगेज अॅक्सेसरीज बसवणे सोपे होऊ शकते.

या स्कूटरमध्ये उंच विंडस्क्रीन, मोठी सीट आणि सरळ बसण्याची पोझिशन मिळण्याची शक्यता आहे. फ्लॅट फ्लोअरबोर्ड कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासोबत लांबच्या राइडसाठीही ही स्कूटर खूप उपयोगी ठरू शकते.

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर

बॅटरी आणि रेंज किती मिळणार?

टेस्टिंगदरम्यान दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक, मध्यभागी बसवलेली इलेक्ट्रिक मोटर आणि चेन ड्राइव्ह रिअर व्हील दिसले आहे. इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये LCD डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. पण बॅटरी आणि मोटरची माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.

संदर्भासाठी, रिव्हर इंडीमध्ये 4kWh बॅटरी, 160km IDC रेंज आणि 90kmph टॉप स्पीड मिळतो. तिची मोटर 9bhp पॉवर आणि 26Nm टॉर्क देते. RX02 मध्येही हेच सेटअप मिळेल असे सध्या निश्चित सांगता येत नाही.

2027 मध्ये लाँच होणार?

RX02 सोबत कंपनी RX03 या कोडनेमने आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर विकसित करत आहे. या दोन्ही मॉडेल्सपैकी कोणती स्कूटर टेस्टिंगमध्ये दिसली आहे, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. RX02 चे भारतीय लाँच 2027 मध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे तिची किंमत, रेंज आणि फीचर्सची माहिती समोर येण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटर 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप लाँचची तारीख जाहीर केलेली नाही.

  • Que: रिव्हर RX02 मध्ये किती रेंज मिळणार आहे?

    Ans: या स्कूटरची बॅटरी आणि रेंज याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. संदर्भासाठी रिव्हर इंडीमध्ये 4kWh बॅटरीसह 160km IDC रेंज मिळते.

  • Que: रिव्हर RX02 मध्ये कोणते नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे?

    Ans: रिव्हर RX02 मध्ये उंच विंडस्क्रीन, स्लिम LED टेललाइट, लगेज रॅकची सोय, दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आणि LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: River rx02 electric scooter testing india launch 2027 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास
1

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे
2

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे

महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतात दाखल होणार; 70 kWh बॅटरीसह मिळणार नवे अपडेट्स!
3

महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतात दाखल होणार; 70 kWh बॅटरीसह मिळणार नवे अपडेट्स!

2026 सुझुकी Access 125 लाँच! नवीन रंगांसह किंमत 83,086 रुपयांपासून सुरू; पाहा व्हेरिएंटनुसार डिटेल्स
4

2026 सुझुकी Access 125 लाँच! नवीन रंगांसह किंमत 83,086 रुपयांपासून सुरू; पाहा व्हेरिएंटनुसार डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.