Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा!

मुंबईत Mercedes-Benz Classic Car Rally 2026 चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरलेली ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ गाडी या रॅलीचे खास आकर्षण ठरली. या गाडीसोबत सरनाईक यांनी फोटोसेशनही केले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 22, 2026 | 05:13 PM
Vintage Mercedes Classic Car Showcase (फोटो सौजन्य-AI एआय)

Vintage Mercedes Classic Car Showcase (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुंबईतील मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीचा उत्साहात शुभारंभ झाला.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरलेल्या ऐतिहासिक मर्सिडीजसोबत सरनाईक यांनी खास छायाचित्र काढले.
  • मर्सिडीज-बेंझच्या 140 वर्षांच्या इतिहासानिमित्त यंदाची रॅली दुर्मीळ आणि जुन्या मोटारगाड्यांनी सजली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरलेल्या ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ गाडीसोबत सरनाईक यांचे फोटो सेशन!

मुंबई, दि. २२ नोव्हेंबर : मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली २०२६’चा शुभारंभ आज रविवारी ताज लँड्स एंड, वांद्रे येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास ही मर्सिडीज-बेंझची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मर्सिडीज-बेंझ ही केवळ एक आलिशान मोटारगाडी नसून सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचे प्रतीक आहे. अशा प्रकारचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास हे आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांचेही स्वप्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच वाहनांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
या रॅलीमध्ये देशभरातील दुर्मीळ, आकर्षक आणि ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाड्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते.

Luxury Electric Car Sales मध्ये 53.1% वाढ! BMW पहिल्या क्रमांकावर, Tesla ची मोठी झेप

विशेष म्हणजे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रवासासाठी वापरलेल्या ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाडीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक गाडीला पाहताच तिच्यासोबत छायाचित्र काढण्याचा मोह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही आवरता आला नाही. त्यांनी या गाडीसोबत छायाचित्र काढून आपल्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी रॅलीतील विविध क्लासिक कार मॉडेल्सची आवर्जून पाहणी केली. प्रत्येक गाडीची निर्मिती, तिची वैशिष्ट्ये, तांत्रिक रचना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याबाबत त्यांनी संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. जुन्या काळातील मोटारगाड्यांची कलात्मकता, अभियांत्रिकी कौशल्य आणि काळानुसार विकसित होत गेलेले ऑटोमोबाईल तंत्रज्ञान याबद्दलही त्यांनी उत्सुकता व्यक्त केली.

मर्सिडीज-AMG GT SUV चा दमदार डेब्यू! 1,153 hp पॉवर, 710 kW फास्ट चार्जिंग आणि 700 km रेंज

सन २०१४ पासून आयोजित करण्यात येणारी ही क्लासिक कार रॅली यंदा मर्सिडीज-बेंझच्या १४० वर्षांच्या गौरवशाली ऑटोमोबाईल इतिहासाचे औचित्य साधून विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. जुन्या आणि दुर्मीळ मोटारगाड्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रातील ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला. या कार्यक्रमाला मर्सिडीज-बेंझ इंडिया, ऑटोकार इंडिया यांचे प्रतिनिधी, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर, क्लासिक कारप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Mercedes-Benz Classic Car Rally 2026 चे उद्घाटन कोणी केले?

    Ans: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

  • Que: Mercedes-Benz Classic Car Rally 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले?

    Ans: मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे 22 नोव्हेंबर 2026 रोजी या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

  • Que: या रॅलीमधील सर्वात खास आकर्षण कोणते होते?

    Ans: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रवासासाठी वापरलेली ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाडी हे या रॅलीचे खास आकर्षण होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या गाडीसोबत छायाचित्र काढले.

Web Title: Mercedes benz classic car rally 2026 pratap sarnaik mumbai vintage cars auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स
1

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास
2

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे
3

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे

महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतात दाखल होणार; 70 kWh बॅटरीसह मिळणार नवे अपडेट्स!
4

महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतात दाखल होणार; 70 kWh बॅटरीसह मिळणार नवे अपडेट्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.