
फोटो सौजन्य: iStock
Maruti S-Presso सध्या देशातील सर्वात स्वस्त कार ठरली आहे. जीएसटीपूर्वी या कारच्या STD (O) व्हेरिएंटची किंमत 4.26 लाख रुपये होती, जी आता कमी होऊन 3.49 लाख रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना सुमारे 76,600 रुपये इतका थेट फायदा मिळतो. जवळपास 18% किंमत कपात झाल्याने ही कार बजेट सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणीची ठरली आहे.
पूर्वी देशातील सर्वात स्वस्त कार असलेली Maruti Alto K10 आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या कारच्या STD (O) व्हेरिएंटची किंमत 4.23 लाख रुपये वरून कमी होऊन 3.69 लाख रुपये झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सुमारे 53,100 रुपये बचत होते. किफायतशीर किंमत आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे Alto K10 अजूनही लोकप्रिय आहे.
2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी
Renault Kwid ही आता देशातील तिसरी सर्वात स्वस्त कार ठरली आहे. या कारच्या 1.0 RXE व्हेरिएंटची किंमत पूर्वी 4.69 लाख रुपये होती, जी आता 4.29 लाख रुपये इतकी झाली आहे. यामुळे ग्राहकांना सुमारे 40,000 रुपये सूट मिळत आहे. SUV-प्रेरित डिझाइन आणि परवडणारी किंमत यामुळे Kwid ही एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरते.
Tata Tiago ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात स्वस्त कार आहे. पूर्वी या कारच्या XE व्हेरिएंटची किंमत 4.99 लाख रुपये होती. मात्र जीएसटी कपातीनंतर आता ही कार 4.57 लाख रुपये पासून उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना सुमारे 42,500 रुपये फायदा झाला आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी आणि आकर्षक लुक्समुळे Tiago या किंमत श्रेणीत व्हॅल्यू फॉर मनी कार मानली जाते.
Maruti Celerio देखील भारतातील स्वस्त कार्सच्या यादीत समाविष्ट आहे. या कारच्या LXI व्हेरिएंटची किंमत आधी 5.64 लाख रुपये होती, जी आता कमी होऊन 4.69 लाख रुपये झाली आहे. यामध्ये ग्राहकांना तब्बल 94,100 रुपये इतकी बचत मिळते. जवळपास 17% किंमत कपात झाल्याने Celerio अधिक किफायतशीर पर्याय ठरली आहे.