2026 मध्ये Nissan 'या' 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी
या बदलांचा भाग म्हणून, १ जानेवारी २०२६ पासून थियरी साबाघ यांच्या जबाबदाऱ्यांचा विस्तार करण्यात आला असून, त्यांच्याकडे आता निसान इंडियाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. ते आता डिव्हिजनल व्हाइस प्रेसिडेंट आणि अध्यक्ष – मध्य पूर्व, KSA, CIS आणि भारत (निसान आणि इन्फिनिटी) या पदावर कार्यरत असतील.
2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार
या विस्तारित भूमिकेमुळे AMIEO प्रदेशातील प्रस्थापित बाजारांमध्ये नेतृत्वाची सातत्यता राखली जाणार असून, भारताला धोरणात्मक प्राधान्याचा बाजार मानत येथे प्रशासन, अंमलबजावणी आणि वाढीचा वेग अधिक मजबूत करण्यावर निसानचा भर असल्याचे स्पष्ट होते.
निसानसाठी २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून, भारत हा कंपनीच्या जागतिक धोरणाचा केंद्रबिंदू आहे. भारतीय बाजारात ब्रँडचे पुनरुज्जीवन वेगाने सुरू असताना, निसान इंडिया पुढील १४ ते १६ महिन्यांत GRAVITE, TEKTON आणि 7-सीटर C-SUV अशी तीन नवीन मॉडेल्स सादर करणार आहे.
यासोबतच, देशभरात २५० टचपॉइंट्स असलेल्या विस्तारित डीलर नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्यावर कंपनीचा भर राहणार आहे.
आपल्या नव्या भूमिकेबाबत बोलताना, थियरी साबाघ म्हणाले, “निसानसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारताना मला सन्मान वाटतो. मध्य पूर्व आणि भारत हे वेगाने वाढणारे बाजार आहेत, जिथे मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आमच्या टीम्स आणि भागीदारांसोबत काम करत, मजबूत पायावर पुढील वाढ साध्य करण्यास मी उत्सुक आहे.”
भारतात Mercedes ने एकाच वेळी लाँच केल्या ‘या’ 2 लक्झरी कार! जाणून घ्या किंमत
या नियुक्तीचे स्वागत करताना, सौरभ वत्सा, व्यवस्थापकीय संचालक, निसान मोटर इंडिया, म्हणाले,
“भारतामध्ये निसानसाठी हा वाढीच्या नव्या टप्प्याचा महत्त्वाचा क्षण आहे. थियरी साबाघ यांच्या अनुभवामुळे आणि नेतृत्वामुळे आमची बाजारातील उपस्थिती अधिक मजबूत होईल. उत्पादन, ग्राहक आणि शाश्वत वाढ यावर लक्ष केंद्रित करत परिवर्तनातून थेट अंमलबजावणीकडे वाटचाल करण्यास हे नेतृत्व मोलाचे ठरेल.”
निसानने याच वेळी लिऑन डॉर्सर्स, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि चीफ ऑफ कमर्शियल ऑपरेशन्स – निसान AMIEO, यांच्या कंपनीतून निर्गमनाचीही घोषणा केली आहे. १९९२ मध्ये निसान युरोपमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या डॉर्सर्स यांनी फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, अमेरिका आणि जपानमध्ये विविध नेतृत्वात्मक भूमिका पार पाडल्या होत्या.
२०२५ मध्ये AMIEO प्रदेशात यशस्वी उत्पादन लाँचनंतर, २०२६ मध्येही हा प्रदेश निसानसाठी अत्यंत आशादायी ठरणार आहे. भारतात GRAVITE आणि TEKTON मॉडेल्सचे २०२६ च्या सुरुवातीला लाँच होणार असून, नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनी आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे.






