फोटो सौजन्य: iStock
भारतात एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांना मागणी मिळत असतानाच सीएनजी वाहनांना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसत आहे. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या त्यांची कार लाँच करताना सीएनजी व्हेरिएंट देखील लाँच करतात.
भारतातील मध्यम वर्गीय कुटुंबांसाठी CNG कार या सर्वात विश्वासार्ह पर्याय बनल्या आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे उत्कृष्ट मायलेज, कमी मेंटेनन्स खर्च आणि किफायतशीर इंधन. प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत CNG कार्स जास्त मायलेज देतात आणि त्या चालवायला स्वस्त असतात. 2025 मध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी आपापले CNG मॉडेल्स बाजारात आणले आहेत. त्यापैकी 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमधील टॉप 5 CNG Cars ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहेत. चला तर मग त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Honda च्या ‘या’ बाईकमध्ये आली मोठी खराबी, कंपनीने युनिट्स बोलवले परत
Maruti Suzuki Swift CNG ही भारतीय बाजारातील लोकप्रिय हॅचबॅक आहे. याची एक्स-शोरूम किंमत 8.20 लाख ते 9.20 लाख दरम्यान आहे. CNG मोडमध्ये ती 32.85 Km/kg इतका मायलेज देते. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी सर्व व्हेरिएंट्समध्ये आता 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. फीचर्समध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचा समावेश आहे. स्टायलिश डिझाइन आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे ती मध्यम वर्गीय कुटुंबांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरते.
Grand i10 Nios CNG ही एक प्रीमियम आणि स्टायलिश हॅचबॅक आहे. याची किंमत7.75 लाख ते 8.38 लाख दरम्यान आहे. कंपनीचा दावा आहे की ती 27 Km/kg इतका मायलेज देते. ही 1.2-लिटर Bi-Fuel पेट्रोल+CNG इंजिनसह उपलब्ध आहे. फीचर्समध्ये 8-इंच टचस्क्रीन, रियर पार्किंग कॅमेरा, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि 6 एअरबॅग्स दिलेले आहेत. स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव आणि हाय क्वालिटीचे इंटिरिअर यामुळे ती विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय ठरते.
‘या’ Electric Bike वर मिळतेय आतापर्यंतची मिळतेय बेस्ट डिस्काउंट, हजारो रुपयांची होणार बचत
जर तुम्हाला SUV हवी असेल तर तुमच्यासाठी Tata Punch CNG हा योग्य पर्याय ठरू शकतो. याची किंमत 7.30 लाख ते 10.17 लाख इतकी आहे. ARAI नुसार, ही SUV 26.99 Km/kg इतका मायलेज देते. यात ड्युअल सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल एअरबॅग्स आणि मजबूत बॉडी असे फीचर्स आहेत. मायक्रो-SUV डिझाइन आणि सेफ्टी स्टँडर्ड्समुळे कमी बजेटमधील सर्वोत्तम SUV म्हणून ती ओळखली जाते.
ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी आणि सर्वाधिक लोकप्रिय असणारी CNG कार आहे. याची किंमत 6.69 लाख ते 7.14 लाख इतकी आहे. तसेच ही कार 34.05 Km/kg इतका मायलेज देते. 1.0-लिटर K-Series इंजिन, कमी मेंटेनन्स आणि Maruti चा विस्तृत सर्विस नेटवर्क यामुळे ही कार मध्यम वर्गीय कुटुंबांसाठी आवडती ठरते.
ही प्रीमियम आणि स्टायलिश SUV आहे. ज्याची किंमत 6.89 लाख पासून सुरू होते. ही कार 27.6 Km/kg मायलेज देते. फीचर्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि 6 एअरबॅग्सचा समावेश आहे.