नवीन GST मुळे 'ही' कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच
किती वेळ टॅक्सी किंवा OLA Uber ने फिरणार? असा प्रश्न नेहमीच आपली मित्रमंडळी आणि नातेवाईक विचारत असतात. अशावेळी नेहमीच आपण योग्य बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असतो. मात्र, आता कार खरेदी करण्याची वेळ आली आहे.
पूर्वी आपल्याला कार खरेदी करताना त्यावर 28 टक्के GST द्यावा लागत होता. मात्र आता नवीन नियमांनुसार, 1200 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या पेट्रोल कार आणि 1500 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या डिझेल कार, 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या कारवर आता 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे अनेक कारच्या किमती कमी झाल्या आहेत.
‘या’ कंपनीच्या कारसाठी विदेशी ग्राहक पागल! चक्क भारतातून 2 लाख युनिट्स निर्यात
Maruti Suzuki च्या अनेक कारच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. मारुती सुझुकीची लोकप्रिय छोटी हॅचबॅक Celerio खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे! जीएसटी दर कमी झाल्यामुळे या कारची किंमत आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
एंट्री-लेव्हल Alto K10 नको असणाऱ्यांसाठी पण कमी बजेटमध्ये विश्वासार्ह कार हवी असणाऱ्यांसाठी सेलेरिओ उत्तम पर्याय ठरेल. 22 सप्टेंबरपासून या कारच्या किंमती कमी झाल्या असून कंपनीने थेट 94 हजार रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे या दिवाळी- दसऱ्याच्या सणासुदीला ग्राहकांना कंपनीच्या खास ऑफर्ससह ही कार आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. कंपनीचा दावा आहे की या दरकपातीमुळे आणि ऑफर्समुळे येत्या काही महिन्यांत सेलेरिओच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
काय सॉलिड लूक आहे राव! BMW ची ‘ही’ लिमिटेड एडिशन बाईक लाँच, पहिल्यांदाच किंमत 3 लाखांपेक्षा कमी
Maruti Suzuki Celerio च्या विविध व्हेरिएंटच्या किमतीत 59,000 ते 94,000 पर्यंत कमी करण्यात आली आहे. किंमत कपातीचा सर्वाधिक फायदा हा LXi बेस व्हेरियंटला झाला असून, त्याच्या किमतीत GST दरातील सुधारणेनंतर 94,000 रुपयांची सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. या तुलनेत, ZXi Plus MT या टॉप व्हेरियंटच्या किमतीत 59,000 रुपयांची सर्वात कमी कपात झाली आहे.