Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

उत्तम परफॉर्मन्स आणि चांगल्या मायलेजसाठी बाईकचे इंजिन ऑइल बदलणे खूप महत्वाचे असते. मात्र, हेच काम तुम्ही स्वतः देखील सहजपणे करू शकता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • बाईकची योग्यरित्या देखभाल करणे महत्वाचे
  • बाईकचे इंजिन ऑइल बदलणे अगदी सोपे
  • जाणून घ्या सोपी पद्धत
बाईक खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे असते. जर तुम्ही तुमची बाईक उत्तमरीत्या मेंटेन ठेवली तरच ती तुम्हाला चांगला मायलेज आणि उत्तम परफॉर्मन्स देईल. बाईकमध्ये अनेक पार्ट्स महत्वाचे असते. यातही सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे इंजिन. जर इंजिन चांगले असेल तर तुमच्या बाईकचे आयुष्य अजून वाढते. इंजिन ऑइल गरजेचे का आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

इंजिन ऑइल इतके महत्वाचे का आहे?

इंजिन ऑइल हे कोणत्याही वाहनचे प्राण मानले जाते. ते वाहनातील पार्ट्सना योग्यरित्या काम करण्यास मदत करते, इंजिनचे तापमान संतुलित ठेवते, धूळ व धातूचे सूक्ष्म कण अडकवून बाहेर काढण्यास मदत करते आणि गिअर शिफ्टिंग अधिक स्मूथ बनवते. भारतासारख्या देशात, जिथे वाहतूक कोंडी, उष्णता आणि धूळ जास्त असते, तिथे इंजिन ऑइलवर अतिरिक्त ताण येतो. वेळेवर ऑइल न बदलल्यास इंजिनचा आवाज वाढू शकतो, मायलेज कमी होऊ शकते आणि एकूण कार्यक्षमता घटू शकते.

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

अनेक जण इंजिन ऑइल खूप कमी वेळा बदलतात. मेकॅनिक बाईकचे इंजिन ऑइल बदलताना जास्त पैसे आकारत असल्याने अनेक रायडर्स पैसे वाचवण्यासाठी इंजिन ऑइल योग्य वेळी बदलत नाही. मात्र, तुम्ही स्वतः देखील इंजिन ऑइल बदलू शकता. चला याबद्दल जाणून घेऊयात.

इंजिन ऑइल बदलताना कोणती तयारी करावी?

सर्वप्रथम आपल्या बाईकसाठी योग्य ग्रेडचे इंजिन ऑइल घ्या. बाईकमध्ये ऑइल फिल्टर असल्यास नवीन फिल्टरही तयार ठेवा. याशिवाय ड्रेन पॅन, स्पॅनर, फनेल, हातमोजे आणि ड्रेन बोल्टसाठी नवीन क्रश वॉशर जवळ ठेवा.

ऑइल बदलण्याची प्रक्रिया

इंजिन 5 ते 10 मिनिटे सुरू करून थोडे गरम करून घ्या, त्यामुळे जुने ऑइल सहज बाहेर पडते. बाईक सेंटर स्टँडवर सरळ उभी करा. वरचा फिलर कॅप आणि खालचा ड्रेन बोल्ट उघडताच जुने ऑइल बाहेर येऊ लागेल. संपूर्ण ऑइल निघेपर्यंत प्रतीक्षा करा.

यानंतर ऑइल फिल्टर बदला. नवीन फिल्टर बसवण्यापूर्वी त्याच्या रबर गॅस्केटवर थोडे ताजे ऑइल लावा, जेणेकरून योग्य सील तयार होईल आणि गळती होणार नाही.

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

नवीन ऑइल भरणे आणि अंतिम तपासणी

निर्धारित प्रमाणात नवीन ऑइल फनेलच्या साहाय्याने भरा. इंजिन एक मिनिट चालू करून बंद करा आणि डिपस्टिक किंवा साइट ग्लासद्वारे ऑइलची पातळी तपासा. जुने ऑइल सुरक्षित कंटेनरमध्ये साठवून जवळच्या सर्व्हिस सेंटर किंवा रीसायकलिंग पॉइंटवर जमा करा. हे छोटेसे काम केवळ खर्च वाचवत नाही, तर तुमच्या बाईकची काळजी घेण्याची सवयही वाढवते आणि इंजिन दीर्घकाळ चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत करते.

 

Web Title: How to change bike engine oil at home know the easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Bike Engine
  • Engine Oil

संबंधित बातम्या

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट
1

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद
2

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत
3

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!
4

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.