फोटो सौजन्य: @Imao_aryan/X.com
भारतीय बाजारात सर्वाधिक मागणी बजेट फ्रेंडली बाईकला जरी मिळत असली तरी आजही मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. भारत अशा अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट पॉवरफुल बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे BMW.
BMW च्या बाईक्सचा तर वेगळाच चाहता वर्ग पाहायला मिळतो. कंपनीच्या बाईक तर हाय परफॉर्मन्स आणि महागड्या किमतीमुळे ओळखली जाते. मात्र, आता कंपनीने एक नवीन बाईक ऑफर केली आहे, जिची किंमत अगदी कमी ठेवण्यात आली आहे.
BMW देशात विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर करत असते. कंपनीने अलीकडेच BMW G 310 RR चा लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. कंपनीने यासोबतच विशेष बॅजिंग आणि एक नवीन रंग सादर केला आहे.चला या बाइकच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.
Honda CB350C चा स्पेशल एडिशन लाँच, किमतीपासून डिलिव्हरीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
कंपनीने सांगितल्यानुसार, या लिमिटेड एडिशन बाईकच्या केवळ 310 युनिट्सच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक युनिटवर त्याचा युनिक नंबर बॅजिंगसह दिला जाईल.
BMW कडून या बाईकमध्ये खालील फीचर्स दिले गेले आहेत:
या बाईकमध्ये 312cc सिंगल-सिलिंडर वॉटर-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनमधून 25 kW पॉवर आणि 27.3 Nm टॉर्क निर्माण होतो. यासोबतच 6-स्पीड ट्रान्समिशन दिलं आहे.
Maruti Invicto क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास? BNCAP मध्ये किती मिळाले रेटिंग?
BMW ने G 310 RR च्या लिमिटेड एडिशनची किंमत 2.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवली आहे. त्यामुळे नक्कीच ही बाईक परवडणाऱ्या किमतीत ऑफर झाली आहे.