Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Gravite लवकरच होणार लाँच! पहिल्यांदाच मिळाली ‘या’ खास फीचर्सची माहिती

निसान त्यांची नवीन एमपीव्ही मार्केटमध्ये आणायच्या तयारीत दिसत आहे. Nissan Gravite असे या कारचे नाव असून सध्या तिच्या फीचर्सची माहिती मिळाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2026 | 06:39 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात Nissan त्यांची नवीन एमपीव्ही आणणार
  • Nissan Gravite असे या एमपीव्हीचे नाव
  • जाणून घ्या फीचर्स
भारतीय ऑटो बाजाराची व्याप्ती लक्षात घेत अनेक विदेशी ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. बाजारात विविध सेगमेंटमधील कार्स उपलब्ध आहेत. यात एसयूव्हीसोबतच एमपीव्ही वाहनांना सुद्धा ग्राहक चांगला प्रतिसाद देत असतात. ग्राहकांच्या याच मागणीकडे लक्ष देत, Nissan त्यांची नवीन MPV भारतात लाँच करणार आहे.

भारतात Nissan कडून एसयूव्ही सेगमेंटमध्ये Nissan Magnite ची विक्री केली जाते. आता कंपनी लवकरच नवीन एमपीव्ही म्हणून Nissan Gravite लाँच करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत लाँचपूर्वीच या कारच्या काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या एमपीव्हीमध्ये कोणत्या सुविधा मिळू शकतात आणि ती कधी लाँच होणार आहे, याचा आढावा घेऊया.

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स

लवकरच होणार लाँच

निसानकडून ग्रेवाइट ही नवीन एमपीव्ही बजेट सेगमेंटमध्ये सादर केली जाणार आहे. किफायतशीर दरात जास्त जागा आणि उपयुक्त फीचर्स देण्यावर कंपनीचा भर असणार आहे.

संभाव्य फीचर्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार या एमपीव्हीमध्ये 8 इंचांचा इन्फोटेनमेंट सिस्टीम दिला जाऊ शकतो. तसेच तिसऱ्या रांगेतील सीट्स गरजेनुसार फोल्ड किंवा काढता येण्याची सुविधा असू शकते. याशिवाय ड्युअल-टोन इंटिरियर डिझाइनमुळे केबिन अधिक आकर्षक दिसेल.

इंजिन आणि ट्रान्समिशन

निसान ग्रेवाइटमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन Renault Triber मध्येही वापरले जाते. या इंजिनमधून सुमारे 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी असे दोन पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे.

Nashik News: ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एका क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

लाँच तारीख

पूर्वी ही एमपीव्ही जानेवारीत लाँच होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ती 17 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारात सादर केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणाशी होणार स्पर्धा?

बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये लाँच होणाऱ्या या कारची थेट स्पर्धा Maruti Ertiga आणि रेनॉ ट्रायबरसारख्या लोकप्रिय मॉडेल्ससोबत होणार आहे.

एकूणच, कमी किमतीत जास्त जागा आणि आवश्यक फीचर्स देण्यावर लक्ष केंद्रित करत निसान ग्रेवाइट भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title: Nissan gravite to be launched soon know launch date expected features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • nissan

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.