
BMW F 450 GS भारतात लाँच! दमदार इंजिन, अॅडव्हेंचर लूक आणि किफायतशीर किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव
घरालाही वीज देईल BMW ची ‘ही’अनोखी कार; 10 मिनिटांच्या चार्जिंगवर धावणार 400km! पाहा ‘हे’ अजब फीचर्स
BMW F 450 GS मध्ये कंपनीचे लोकप्रिय GS डिझाईन पाहायला मिळत आहे. यामुळे बाईकला एक मजबूत आणि खास लुक मिळतो. बाईकच्या समोरील बाजूला X आकाराची फुल एलईडी हेडलाईट देण्यात आली आहे. तसेच, याचे खास बीक आणि बॉडी पॅनल्स याला एक एडवेंचर बाईकवाला लूक देतात. बाईकचा मागील भाग निमुळता ठेवण्यात आला आहे आणि यामध्ये 14-लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू ही बाईक बेस, एक्सक्लुझिव्ह आणि जीएस ट्रॉफी या तीन व्हेरिएंटमध्ये सादर करत आहे. यामध्ये वेगवेगळे रंगसंगती आणि किरकोळ बदल पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – BMW)
BMW F 450 GS मध्ये नवीन 450cc चे ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 48hp ची पावर आणि 43nm चे टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड गियरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. तसेच यामध्ये स्मूद राइडिंगसाठी खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. BMW F 450 GS ची टॉप स्पीड 165 किमी प्रति तास आहे. कंपनीने यामध्ये शिफ्ट असिस्टेंट प्रो दिले आहे, ज्यामुळे क्लचशिवाय गियर बदलले जाऊ शकतात आणि यासोबतच ERC देखील आहे. हे फीचर कमी वेगाने बाईक चालवणं अधिक सोपं करत आणि राईडरचा थकवा देखील दूर करते.
BMW F 450 GS एक ट्यूबुलर स्टील फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे मजबूती आणि हलके वजन यांच्यामध्ये संतुलन राहते. यामध्ये समोरील बाजूला अपसाइड-डाउन फोर्क्स आणि मागील बाजूला एडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी यामध्ये समोर 4-पिस्टन कॅलीपरसह सिंगल डिस्क आणि मागील बाजूला डिस्क ब्रेक दिला आहे, जो ABS प्रो सपोर्टसह येतो. अधिक चांगल्या ऑफ-रोडिंगसाठी यामध्ये 19-इंच फ्रंट आणि 17-इंचाचा रियर व्हील देण्यात आला आहे, जिथे डुअल-पर्पज टायर लावले आहेत. या बाईकच्या सीटची उंची 845mm, व्हीलबेस 1465mm आणि ग्राउंड क्लीयरेंस 220mm आहे.