Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Auto News: भारतीय ऑटो बाजारासाठी मोठी घोषणा! स्टेलँटिसचा २०३० पर्यंतचा प्लॅन, १२ नवीन उत्पादनांची तयारी

Auto News: स्टेलँटिसने भारतातील व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अंदाजे ४,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणुकीची घोषणा केली आहे. फास्टलेन २०३० या योजनेअंतर्गत जीप आणि सिट्रॉएन हे ब्रँड पुढील तीन वर्षांत सात नवीन उत्पादने आणि पाच प्रमुख अपग्रेड्ससह एकूण १२ उत्पादने सादर करणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 19, 2026 | 01:45 PM
Auto News: : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Auto News: : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

• जीप® आणि सिट्रॉएन ब्रँड्सअंतर्गत पुढील तीन वर्षांत १२ उत्पादने, सात पूर्णपणे नवीन उत्पादने आणि पाच प्रमुख अपग्रेड्स, ज्यामुळे प्रमुख प्रवासी वाहन श्रेणींमध्ये स्टेलँटिसचा सहभाग अधिक व्यापक होईल.
• अंदाजे ४,००० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक, ज्यामुळे २०३० पर्यंत भारतातील स्टेलँटिसची एकूण एकत्रित गुंतवणूक ११,००० कोटी रुपयांवरून अंदाजे १५,००० कोटी रुपयांवर पोहोचेल.
• कार्यक्षम आयसीई, हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड आणि बॅटरी-इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेला मल्टि-एनर्जी पोर्टफोलिओ.
• ग्रुपसाठी उत्पादन, अभियांत्रिकी आणि निर्यात केंद्र म्हणून भारताच्या भूमिकेला दिलेली गती आणखी वाढणार.
• या नवीन रोडमॅपअंतर्गत पहिले उत्पादन २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच होणार.

ऑक्टोबर २०२६: स्टेलँटिसने आज भारतात आपल्या वाढीच्या पुढील टप्प्याची घोषणा केली, ज्यामधून व्यवसायाचा पाया रचण्याकडून त्याचा विस्तार करण्याकडे होणारा बदल अधोरेखित होतो. फास्टलेन २०३० अंतर्गत, जीप® आणि सिट्रॉएन पुढील तीन वर्षांत १२ उत्पादने – सात पूर्णपणे नवीन उत्पादने आणि पाच प्रमुख अपग्रेड्स सादर करतील.

भारतातील रस्त्यांवर जीप आणि सिट्रॉएनच्या वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढवणे हे यामागील स्पष्ट उद्दिष्ट आहे. या लाँचेसमध्ये बी, सी, डी एसयूव्ही सेगमेंट्समधील उत्पादने, एक एमपीव्ही, ए-सेगमेंट कार आणि प्रीमियम पिकअप यांचा समावेश असेल. या नवीन रोडमॅपअंतर्गत पहिले उत्पादन २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत लाँच करण्याचे नियोजित आहे. Auto News

दोन्ही ब्रँड्स स्वतंत्र

या उत्पादन मोहिमेला पुढील ३ वर्षांत अंदाजे ४,००० कोटी रुपये (अंदाजे ४,०० दशलक्ष युरो) नवीन गुंतवणुकीचे पाठबळ लाभेल, ज्यामुळे २०३० पर्यंत भारतातील स्टेलँटिसची एकूण एकत्रित गुंतवणूक अंदाजे १५,००० कोटी रुपयांवर पोहोचेल. या रोडमॅपमध्ये ५ जीप आणि ७ सिट्रॉएन उत्पादनांच्या लाँचचा समावेश आहे आणि दोन्ही ब्रँड्स स्वतंत्र तरीही एकमेकांना पूरक भूमिका बजावतील. एकत्रितपणे ही उत्पादने स्टेलँटिसला भारतातील प्रवासी वाहन उद्योगातील सर्व उच्च-संधी असलेल्या सेगमेंट्समध्ये घेऊन जातील, ज्यांचा बाजारपेठेत मोठा वाटा आहे.

व्यवसायाला गती मिळत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. कॅलेंडर वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत स्टेलँटिस इंडियाच्या व्यवसायात ३५ टक्‍के वाढ झाली, तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत सिट्रॉएनच्या रिटेल विक्रीत ६८ टक्‍के वाढ झाली.

दीर्घकालीन कटिबद्धता

या घोषणेबाबत मत व्यक्त करत स्टेलँटिस एशिया-पॅसिफिक रिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तियांशू शिन म्हणाले, “स्टेलँटिससाठी भारताची दुहेरी भूमिका आहे: ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे, जिथे आम्हाला विस्तार करायचा आहे आणि संपूर्ण प्रदेश व व्यापक ग्रुपसाठी हा सातत्याने विस्तारत जाणारा महत्त्वपूर्ण कॅपॅबिलिटी बेस आहे.

भारत आमच्यासाठी दीर्घकालीन कटिबद्धता आहे, केवळ विक्री संपादित करण्याची बाजारपेठ नाही. फास्टलेन २०३० अंतर्गत, आमचे रीजन-लेड मॉडेल भारतातील टीमला निर्णय घेण्याचे अधिक अधिकार देते आणि आज आम्ही जाहीर करत असलेल्या रोडमॅपमधून या बाजारपेठेवरील आमचा दीर्घकालीन विश्वास दिसून येतो. अधिक सक्षम उत्पादन साखळी, मल्टि-एनर्जी तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन आणि उत्पादन, अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर व सोर्सिंगमधील भारताच्या क्षमता आम्हाला २०३० पर्यंत येथे अधिक मोठा आणि स्पर्धात्मक व्यवसाय उभारण्यासाठी प्रबळ पाया देतात.”

भारतातील ग्राहकांना विविध सेगमेंट्स

स्टेलँटिस इंडियाचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश हजेला म्हणाले, “भारताप्रती आमची कटिबद्धता आम्ही रस्त्यावर उतरवत असलेल्या सर्वोत्तम उत्पादनावरून तपासली जाईल. गेल्या काही वर्षांत प्रबळ पाया रचल्यानंतर आता आमचे व्यवसाय विस्तारण्यावर लक्ष केंद्रित आहे.

पुढील तीन वर्षांत जीप आणि सिट्रॉएन अंतर्गत होणारे १२ लाँच बाजारपेठेतील आमचा सहभाग लक्षणीयरित्या वाढवतील आणि अधिक सखोल स्थानिक उत्पादन, तसेच अधिक मजबूत विक्री व सेवा नेटवर्कच्या पाठबळासह भारतातील ग्राहकांना विविध सेगमेंट्स आणि पॉवरट्रेन्समध्ये अधिक पर्याय देतील. अंदाजे 4,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणुकीसह, आम्ही या बाजारपेठेत अधिक मोठा विस्तार, प्रासंगिकता आणि स्पर्धात्मकता निर्माण करत आहोत, तसेच स्टेलँटिसच्या जागतिक कामकाजात भारताची भूमिका अधिक दृढ करत आहोत.”

बेंगळुरूमध्ये अभियांत्रिकी व सॉफ्टवेअर क्षमता

हा पुढील टप्पा उत्पादन, अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर, सोर्सिंग आणि निर्यातीमध्ये आजवर भारतात गुंतवलेल्या ११,००० कोटी रुपयांहून अधिक (१ अब्ज युरोहून अधिक) गुंतवणुकीवर आधारित आहे. स्टेलँटिस सध्या भारतात महाराष्ट्रातील रांजणगाव आणि तामिळनाडूतील तिरुवल्लूर व होसूर येथे तीन उत्पादन प्रकल्प चालवते, यासोबत बेंगळुरूमध्ये अभियांत्रिकी व सॉफ्टवेअर क्षमता, हैदराबादमध्ये आयसीटी उपस्थिती आणि देशांतर्गत पुरवठादारांची वाढती परिसंस्था कार्यरत आहे.

भारतातील ग्राहकांच्या गरजांनुसार तयार

या नवीन रोडमॅपअंतर्गत, जीप® नवीन उत्पादने आणि प्रगत पॉवरट्रेन पर्यायांसह अनेक सेगमेंट्समध्ये आपला सहभाग वाढवून प्रीमियम एसयूव्ही क्षेत्रात स्टेलँटिसचे स्थान अधिक दृढ करेल. तसेच क्षमता, विश्वासार्हता आणि वैशिष्ट्यपूर्ण एसयूव्ही डिझाइन या आपल्या मूळ वैशिष्ट्यांवर अधिक भर देईल. सिट्रॉएन भारतातील ग्राहकांच्या गरजांनुसार तयार केलेल्या सुलभ, वेगळेपण जपणाऱ्या उत्पादनांद्वारे मुख्य प्रवाहातील आणि मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या सेगमेंट्समध्ये व्यापक सहभाग नोंदवेल, ज्यामध्ये आरामदायीपणा, डिझाइन आणि तंत्रज्ञानावर विशेष भर देऊन ब्रँडला अधिक मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यास सक्षम केले जाईल.

सिट्रोएन भारतात आणणार 3 नवीन गाड्या! छोटी कार, मोठी SUV आणि MPV साठी तयारी सुरु

भारतातील मोबिलिटी क्षेत्रामधील बदल अनेकविध तंत्रज्ञानावर आधारित असेल हे ओळखून भावी पोर्टफोलिओ कार्यक्षम इंटर्नल कम्बशन इंजिन्स, हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड (पीएचईव्ही) आणि बॅटरी-इलेक्ट्रिक (बीईव्ही) तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या मल्टि-एनर्जी धोरणाचा अवलंब करेल, ज्यासाठी स्टेलँटिसच्या जागतिक क्षमतांचा आधार घेतला जाईल.

ग्राहकांच्या गरजा, परवडण्यायोग्यता, नियम, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि वैयक्तिक सेगमेंटचे आर्थिक गणित यांच्या आधारे पॉवरट्रेनचे पर्याय ठरवले जातील, ज्यामुळे योग्य ग्राहकाला आणि गरजेनुसार योग्य तंत्रज्ञान मिळण्याची खात्री घेतली जाईल.

बाजारपेठांमध्ये विस्तारासाठी पाठबळ

अधिक उत्पादनांसोबत ग्राहकांची पोहोच आणि वाहनाच्या मालकीबद्दलचा आत्मविश्वासही वाढवला जाईल. स्टेलँटिस आपले एकत्रित जीप आणि सिट्रॉएन नेटवर्क सातत्याने वाढवत आहे, तसेच विक्रीचा विस्तार, सेवा क्षमता, सुट्या भागांची उपलब्धता आणि मालकीहक्काचा अनुभव यांवर विशेष भर देत आहे. स्टेलँटिस ब्रँड हाउस फॉर्मेट व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असणाऱ्या द्वितीय आणि तृतीय/चतुर्थ श्रेणीच्या शहरांमधील उच्च-संधी असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तारासाठी पाठबळ देईल.

या धोरणामध्ये स्थानिकीकरणाला प्राधान्य दिले जाईल, ज्यामध्ये भावी उत्पादने व्यावसायिक आणि तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असेल तिथे भारताच्या औद्योगिक, अभियांत्रिकी आणि पुरवठादार परिसंस्थेचा पूर्ण लाभ घेतील. स्टेलँटिसचे दोन्ही ब्रँड्समध्ये ९० टक्‍के स्थानिक पातळी गाठण्याचे उद्दिष्ट आहे, तसेच ग्रुपच्या जागतिक सोर्सिंगमध्ये भारताचे योगदान सातत्याने प्रबळ करत राहील.

भारतात विकसित केलेल्या वाहनांची देशांतर्गत

भारत ग्रुपसाठी निर्यात केंद्र म्हणून अधिक मोठी भूमिका बजावेल. स्टेलँटिस सध्या भारतातून जवळपास ५० देशांना निर्यात करते आणि कंपनीच्या होसूर प्रकल्पात तयार होणाऱ्या इंजिन आणि गिअरबॉक्सेसपैकी अंदाजे ९५ टक्‍के भाग निर्यात केले जातात. फास्टलेन २०३० अंतर्गत, ग्रुपच्या आशिया-पॅसिफिक धोरणाचा भाग म्हणून भारतात विकसित केलेल्या वाहनांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी निर्यात करण्याचे नियोजन आहे.

भारतात हायब्रीड SUV ची मोठी लाट! ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोससह 4 नवीन गाड्यांची तयारी; जाणून घ्या डिटेलमध्ये

पुढील टप्प्याचे उद्दिष्ट स्पष्ट आहे: अधिक सेगमेंट्स, अधिक ग्राहक आणि अधिक पॉवरट्रेनचे पर्याय, ज्यासह देशभरात जीप आणि सिट्रॉएनची उपस्थिती वाढेल. वैयक्तिक उत्पादने, पॉवरट्रेन्स आणि त्यानंतर लाँचच्या वेळेचा तपशील संबंधित बाजारपेठेतील सादरीकरणाच्या जवळ जाहीर केला जाईल.

Web Title: Stellantis india investment 4000 crore jeep citroen 12 new products 2030 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • auto news
  • Jeep India

संबंधित बातम्या

बाईकप्रेमींसाठी खुशखबर! BSA Gold Star 650 नव्या दोन रंगांत सादर; लूक पाहून व्हाल फिदा
1

बाईकप्रेमींसाठी खुशखबर! BSA Gold Star 650 नव्या दोन रंगांत सादर; लूक पाहून व्हाल फिदा

Vijay Sales Grand Electronics Sale : टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून वॉशिंग मशिनपर्यंत स्वस्तात खरेदी; विजय सेल्सचा ग्रँड इलेक्ट्रॉनिक
2

Vijay Sales Grand Electronics Sale : टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून वॉशिंग मशिनपर्यंत स्वस्तात खरेदी; विजय सेल्सचा ग्रँड इलेक्ट्रॉनिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.