Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानने खरेदी केली करोडोंची बुलेटप्रूफ कार; गाडीत आहेत हे खास फिचर्स

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर आणि घरावर फायरिंग झाल्यानंतर सलमानने त्याच्या ताफ्यामध्ये अनेक बुलेटप्रुफ कार खरेदी केल्या. Y+ सिक्युरिटीमध्ये राहणाऱ्या भाईजानने आणखी एक अलिशान कार खरेदी केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 25, 2025 | 04:55 PM
सलमान खानने खरेदी केली करोडोंची बुलेटप्रूफ कार; गाडीत आहेत हे खास फिचर्स

सलमान खानने खरेदी केली करोडोंची बुलेटप्रूफ कार; गाडीत आहेत हे खास फिचर्स

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला विशेष ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. अभिनेता सर्वाधिक त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ओळखला जातो. अभिनेता सलमान खान याच्याकडे अनेक महाग आणि लक्झरियस कार्स आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर आणि अभिनेत्याच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’वर फायरिंग झाल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या ताफ्यामध्ये अनेक बुलेटप्रुफ कार खरेदी केल्या आहेत. Y+ सिक्युरिटीमध्ये राहणाऱ्या भाईजानने आता आणखी एक नवीन अलिशान कार खरेदी केली आहे.

काजोलच्या ‘Maa’ चित्रपटाला सेन्सॉरकडून मिळाला हिरवा सिग्नल, कोणत्याही कटशिवाय होणार प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपूर्वीच सलमान खानने एक नवीन अलिशान बुलेटप्रुफ SUV कार खरेदी केली होती, जी कार त्याने दुबईवरुन खरेदी केलेली होती. अभिनेत्याच्या अलिशान कार कलेक्शनमध्ये मर्सिडिज बेंझ मेबॅक जीएलएस ही कार देखील आहे. अभिनेत्याने नुकतंच ही अलिशान कार खरेदी केली आहे. मर्सिडिज बेंझ मेबॅक जीएलएस या कारची मुंबईतील शोरूमची किंमत ३.३९ – ३.७१ कोटी रुपये आहे. बुलेटप्रूफ आर्मरिंगसह या लक्झरी कारची किंमत सहजपणे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त जाते. ५ सीटर फुल साईज मर्सिडीजचे इंजिन ३९८२ सीसी आहे. तिचा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास इतका आहे.

‘कलाकारांना नावं ठेवणे थांबवा…’, ‘Sardaar Ji 3’ चित्रपटाच्या वादादरम्यान दिलजीत दोसांझच्या मॅनेजरचे मोठे विधान

दरम्यान, भारतातील अनेक सेलिब्रिटींसह उद्योजकांकडे, क्रिकेटर्सकडे आणि राजकारणी नेत्यांकडे मेबॅक GLS600 ही कार आहे. परंतु सलमान खान अशी बुलेटप्रूफ कार असलेला कदाचित पहिलाच स्टार आहे. सलमान खान त्याच्या मेबॅक GLS600 या कारमध्ये दिसला. विरल भयानी ह्या पापाराझीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये सलमान खान मर्सिडीज-मेबॅक GLS600 SUV च्या पुढच्या सीटवर बसलेला दिसतो. पोस्टमध्ये म्हटले आहे की ही त्याची नवीन मर्सिडीज-बेंझ GLS600 SUV आहे.

“आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली…”, ‘तू ही रे माझा मितवा’ फेम अभिनेत्रीने वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या; म्हणाली…

GLS600 हे GLS श्रेणीतील प्रमुख मॉडेल आहे, ज्यामध्ये लाउंज-शैलीतील सीटिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, मागील-सीट मनोरंजन पॅकेज, कॉम्पॅक्ट रेफ्रिजरेटर, बर्मेस्टर ऑडिओ सिस्टम, व्हर्च्युअल असिस्टंट आणि बरेच काही समाविष्ट आहे. ही लक्झरी SUV 22-इंच अलॉय व्हील्सवर चालते, जी 23-इंच व्हील्समध्ये देखील अपग्रेड केली जाऊ शकते. मेबॅक GLS600 मधील इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑटोमॅटिक एक्सटेंडिंग साइड स्टेप्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा इत्यादींचा समावेश आहे. या लक्झरी एसयूव्हीला पॉवर देणारे 4.0-लिटर V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे 550 bhp आणि 730 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे जे मर्सिडीजच्या 4Matic AWD सिस्टमद्वारे सर्व चार चाकांना पॉवर पाठवते. कामगिरीच्या बाबतीत, ते फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि त्याचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.

Web Title: Bollywood actor salman khan bulletproof car mercedes maybach gls600 suv 3 crore 90 lakh price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.