Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'कांटे', 'काबिल', 'शूटआउट अ‍ॅट वडाळा' आणि 'मुंबई सागा' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले. ३० ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील राहत्या घरी बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 12:38 PM
बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

Follow Us
Follow Us:
  • बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत
  • ‘कांटे’ फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांची एक्झिट
  • वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sanjay Gupta Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. या अपघातानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.(Sanjay Gupta Passes Away)

अशोक पंडित यांनी दिली निधनाची माहिती

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर संजय गुप्ता यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये संजय गुप्ता यांना जवळचा मित्र आणि उत्कृष्ट दिग्दर्शक असल्याचे म्हटले आहे. संजय गुप्ता हे नेहमी उत्साही असणारे, उत्तम कथा सांगणारे आणि चित्रपट निर्मितीबद्दल प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत अशोक पंडित यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून तपास सुरू केला आहे.

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

१९९४ मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी ‘राम शास्त्र’, ‘हमेशा’, ‘जंग’ आणि ‘खौफ’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कांटे’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि लकी अली यांसारखे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली.

संजय दत्तसोबत गाजली जोडी

संजय गुप्ता आणि अभिनेता संजय दत्त यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष लोकप्रिय होती. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘मुसाफिर’, ‘जिंदा’ आणि ‘शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमुळे ही जोडी चर्चेत राहिली. याशिवाय त्यांनी ‘शूटआउट अ‍ॅट वडाळा’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. विशेषतः हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

दिग्दर्शनासोबत निर्मिती आणि लेखन क्षेत्रातही योगदान

संजय गुप्ता यांनी केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर निर्माता आणि पटकथालेखक म्हणूनही चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. ‘दस कहानियां’, ‘प्लान’, ‘वुडस्टॉक व्हिला’, ‘अ‍ॅसिड फॅक्टरी’ आणि ‘पंख’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीशी ते संबंधित होते. अ‍ॅक्शन, गुन्हेगारी विश्व आणि थरारक कथानकांची मांडणी ही त्यांच्या चित्रपटांची खास ओळख होती. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका वेगळ्या शैलीच्या दिग्दर्शकाला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय गुप्ता कोण होते?

    Ans: संजय गुप्ता हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक होते. 'कांटे', 'काबिल', 'शूटआउट अ‍ॅट वडाळा' आणि 'मुंबई सागा' यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जात होते.

  • Que: संजय गुप्ता यांचे निधन कधी आणि कसे झाले?

    Ans: संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: संजय गुप्ता यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट कोणता होता?

    Ans: १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला 'आतिश : फील द फायर' हा संजय गुप्ता यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sanjay gupta death kaante kaabil director passes away at 57 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Bollywood
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
1

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

Ranbir Kapoor: ‘रामायण’मधून संस्कारांची शिदोरी! रणबीर कपूरसह दिग्गजांचा ५०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद
2

Ranbir Kapoor: ‘रामायण’मधून संस्कारांची शिदोरी! रणबीर कपूरसह दिग्गजांचा ५०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद

Sonali Kulkarni Movie: सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ चित्रपटावर महेश बाबूच्या मुलाची नाराजी, रेटिंग पाहून व्हाल थक्क!
3

Sonali Kulkarni Movie: सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ चित्रपटावर महेश बाबूच्या मुलाची नाराजी, रेटिंग पाहून व्हाल थक्क!

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा
4

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.