Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan: ‘अब आया ऊंट पहाड़ के नीचे’, भारतात राहायचं असेल तर राजकीय आंदोलन नको; इम्रान खानची कोर्टात माफी, नेमकं प्रकरण काय?

Imran Khan: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान यांने बॉम्बे हायकोर्टात बिनशर्त माफी मागत यापुढे भारतातील कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने त्यांची माफी स्वीकारत 'लीव्ह इंडिया नोटीस'ला अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 02, 2026 | 06:16 PM
'अब आया ऊंट पहाड़ के नीचे', भारतात राहायचं असेल तर राजकीय आंदोलन नको; इम्रान खानची कोर्टात माफी, नेमकं प्रकरण

'अब आया ऊंट पहाड़ के नीचे', भारतात राहायचं असेल तर राजकीय आंदोलन नको; इम्रान खानची कोर्टात माफी, नेमकं प्रकरण

Follow Us
Follow Us:
  • इम्रान खान यांनी मागितली बिनशर्त माफी?
  • यापुढे आंदोलनात सहभागी होणार नसल्याची चर्चा
  • यापुढे आपण निदर्शनांमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले
Imran Khan: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (Imran Khan) यांने २ नोव्हेंबर २०२६ रोजी बॉम्बे हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. यापुढे भारतातील कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याची माफी आणि प्रतिज्ञापत्र स्वीकारत त्यांना दिलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’ला अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

‘भारतीय नागरिक अमेरिकेत आंदोलनात सहभागी झाला असता तर…’

याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने इम्रान खानने ओसीआय (OCI – Overseas Citizen of India) कार्डधारक असल्याची आठवण करून दिली. ओसीआय कार्डधारकांना भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व अधिकार मिळत नाहीत. भारतात राहून सरकार किंवा व्यवस्थेविरोधात राजकीय आंदोलनात सहभागी होण्याच्या त्यांच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

Entertainment News: प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन! आयुष्यभरातील अनुभवांचा अनोखा शब्दाविष्कार

यावेळी न्यायालयाने उदाहरण देताना म्हटले की, एखादा भारतीय नागरिक अमेरिकेत जाऊन तेथील आंदोलनात सहभागी झाला असता, तर त्याला पुढच्या विमानाने भारतात परत पाठवण्यात आले असते. या उदाहरणातून न्यायालयाने इम्रान खान यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

न्यायालयाचा इम्रान खानला सवाल

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने इम्रान खानला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला असून इम्रान खान याचा जन्म भारतात झाला.लहानपणापासून येथेच वाढला असून त्याचे शिक्षणही भारतात झाले आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. असे असताना त्याने आतापर्यंत भारतीय नागरिकत्व का घेतले नाही, असा सवाल न्यायालयाने केला.

सुरुवातीला इम्रान खान यांनी यापुढे आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, न्यायालयाने केवळ आश्वासन पुरेसे नसल्याचे स्पष्ट केले. याचिकेवर विचार करण्यासाठी बिनशर्त माफी आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयात बिनशर्त माफीनामा आणि प्रतिज्ञापत्र सादर केले.

७ डिसेंबरपर्यंत भारतात राहण्यास अंतरिम दिलासा

इम्रान खानच्या माफीनाम्याची आणि प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला आहे. त्याच्यायाविरोधात जारी करण्यात आलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’वरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत त्यांना भारतात राहता येणार आहे.

न्यायालयाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचाही उल्लेख केला. तसेच इम्रान खान यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात निवडणूक आयुक्तांविरोधात राजकीय आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बॉलिवूड अभिनेता इम्रान खान सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना काही काळासाठी ताब्यात घेतले होते.

इम्रान खानचा जन्म भारतात झाला असला, तरी त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. ते भारतात ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डच्या माध्यमातून वास्तव्यास आहेत. या आंदोलनातील सहभागानंतर त्यांच्या विरोधात ‘लीव्ह इंडिया नोटीस’ जारी करण्यात आली होती. या नोटीसला त्याने न्यायालयात आव्हान दिले होते. आता न्यायालयाने त्यांच्या माफीनाम्याची दखल घेत अंतरिम दिलासा दिला असून, ७ डिसेंबरच्या सुनावणीत या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: इम्रान खान यांनी बॉम्बे हायकोर्टात माफी का मागितली?

    Ans: मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या विरोधात 'लीव्ह इंडिया नोटीस' जारी करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.

  • Que: इम्रान खान यांनी न्यायालयात कोणते आश्वासन दिले?

    Ans: यापुढे भारतातील कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात सादर केले.

  • Que: इम्रान खान यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होणार आहे?

    Ans: बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर २०२६ रोजी निश्चित केली आहे. तोपर्यंत 'लीव्ह इंडिया नोटीस'वरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

Web Title: Imran khan unconditional apology no participation in protests sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bombay High Court
  • Imran khan

संबंधित बातम्या

Sahil Wakode Suicide Case : जातीय भेदभावाच्या आरोपांची CBI चौकशीची मागणी करत साहिलच्या पालकांची हायकोर्टात धाव!
1

Sahil Wakode Suicide Case : जातीय भेदभावाच्या आरोपांची CBI चौकशीची मागणी करत साहिलच्या पालकांची हायकोर्टात धाव!

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
2

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश
3

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
4

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.