फोटो सौजन्य: @GaadiKey (X.com)
भारतात बुलेट बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आजही ही बाईक रस्त्यावर धावताना दिसली की अनेकांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. म्हणूनच तर रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची विक्री झपाट्याने वाढत आहे. पण या बाईकला टक्कर देणाऱ्या अन्य बाईक सुद्धा मार्केटमध्ये आपली हवा करत आहे. नुकतेच Jawa या दुचाकी उत्पादक कंपनीने आपली नवीन बाईक मार्केटमध्ये आणली आहे. यामुळे नक्कीच बुलेट बाईकला चांगली टक्कर मिळणार यात वाद नाही.
जावा 350 ने भारतीय बाजारपेठेत नवीन व्हेरियंटसह एंट्री मारली आहे. जावा 350 लेगसी एडिशन सर्व स्टॅंडर्ड फीचर्ससह बाजारात आणण्यात आले आहे. या बाईकच्या पहिल्या 500 ग्राहकांना मोठा फायदा दिला जात आहे. या बाईकच्या पहिल्या 500 खरेदीदारांसाठी जावा 350 लेगसी एडिशनची किंमत 1.99 लाख रुपये आहे. यानंतर, ही बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी ही बाईक 16 हजार रुपयांनी महाग झाली असेल.
10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित
जावा 350 च्या या स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये टूरिंग व्हॉयझर, पिलियन बॅकरेस्ट आणि क्रॅश गार्ड सारखे काही नवीन फीचर्स आहेत. या बाईकमध्ये लेदर कीचेन देखील देण्यात आली आहे. कलेक्टर एडिशन हे या बाईकचे एक लहान मॉडेल आहे. या स्पेशल एडिशनच्या इंजिनमध्ये बाईक कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. ही बाईक 334 सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिनने सुसज्ज आहे. बाईकवरील हे इंजिन 7000 आरपीएम वर 22.5 hp पॉवर आणि 5,000 आरपीएम वर 28.1 एनएम टॉर्क निर्माण करते.
जावा 350 चे नवीन व्हेरियंट गेल्या वर्षी 2024 मध्ये लाँच करण्यात आले होते. या नवीन व्हेरियंटच्या लाँचिंगसह, बाईकची किंमत 16 हजार रुपयांनी कमी झाली. जावा 350 बेस स्पोक-व्हील व्हेरियंटची किंमत 1.99 लाख रुपये आहे आणि अलॉय-व्हील व्हेरियंटची किंमत 2.08 लाख रुपये आहे. या बाईकच्या टॉप-एंड क्रोम व्हेरियंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, स्पोक व्हील व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.15 लाख रुपये आहे आणि अलॉय व्हील व्हेरियंटची किंमत 2.23 लाख रुपये आहे.
Mahindra Scorpio N होणार अधिकच आकर्षक, ‘या’ दिवशी लाँच होणार Black Edition
या सेगमेंटमध्ये जावा 350 चा प्रतिस्पर्धी रॉयल एनफील्ड बुलेट 350 आहे. 350 सीसी सेगमेंटमध्ये, या बाईक्स स्टाईल, पॉवर आणि किमतीत एकमेकांशी स्पर्धा करतात. बुलेट 350 ची एक्स-शोरूम किंमत 1,73,562 रुपयांपासून सुरू होते आणि 2,15,801 रुपयांपर्यंत जाते. बुलेट 350 बाजारात सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये ड्युअल चॅनेल ABS चे सेफ्टी फीचर आहे.