Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे

गाडीची इंधन टाकी फुल ठेवल्याने वेळ वाचते आणि फ्यूएल पंप सुरक्षित राहतो; मात्र ऑटो-कट नंतरही काठोकाठ पेट्रोल भरल्याने 'चारकोल कॅनिस्टर' खराब होऊन इंधन गळतीचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आणि वाहनाच्या दीर्घ आयुष्यासाठी केवळ ऑटो-कट मर्यादेपर्यंतच इंधन भरणे अधिक फायदेशीर ठरते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 13, 2026 | 06:57 PM
गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे
Follow Us
Follow Us:

गाडीची टाकी फुल करणे हा पेट्रोल पंपावर गेल्यावर अनेकांचा नेहमीचा स्वभाव असतो. वारंवार पंपावर जाण्याचा त्रास वाचवण्यासाठी ‘टँक फुल’ करण्याचा पर्याय सोयीचा वाटतो. पण, गाडीची टाकी काठोकाठ भरणे नेहमीच फायद्याचे असते असे नाही. याचे काही महत्त्वाचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत,

टाकी फुल करण्याचे फायदे

  • वेळेची आणि इंधनाची बचत: वारंवार पेट्रोल पंप वर जावे लागत नाही. त्यामुळे वेळ तर वाचतोच, पण पंपापर्यंत फेऱ्या मारण्यात वाया जाणारे इंधनही वाचते.
  • लांबच्या प्रवासात उपयुक्त: हायवेवर किंवा अनोळखी मार्गावर प्रवास करताना पुढे पेट्रोल पंप कधी येईल याची शाश्वती नसते. अशा वेळी टाकी फुल असल्यास प्रवासाचा ताण राहत नाही.
गाडी चालवताना बॅटरी नेमकी कशी चार्ज होते? जाणून घ्या सोप्या भाषेत
  • फ्यूएल पंपची सुरक्षितता: आधुनिक गाड्यांमध्ये इंधन पंपाचे  तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेल कूलंट म्हणून काम करते. टाकीत पुरेसे इंधन असल्यास फ्यूएल पंप जास्त गरम होत नाही आणि त्याचे आयुष्य वाढते.
टाकी फुल करण्याचे तोटे
  • पेट्रोलची नासाडी आणि वास: प्रत्येक गाडीच्या टाकीत इंधनाच्या वाफेसाठी थोडी रिकामी जागा सोडलेली असते. पेट्रोल पंपावरील ऑटो-कट झाल्यानंतरही वरून जबरदस्तीने पेट्रोल भरल्यास, अतिरिक्त इंधन ‘इव्हॅपोरेटिव्ह एमिशन सिस्टीम’मध्ये जाते. यामुळे पेट्रोल गळती होऊन गाडीत उग्र वास येऊ लागतो.
  • गाडीचे नुकसान: अतिरिक्त पेट्रोलमुळे गाडीच्या ‘चारकोल कॅनिस्टर’ या भागाचे नुकसान होऊ शकते. हा भाग दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च येतो आणि गाडीच्या मायलेजवरही परिणाम होतो.
बाईकची बॅटरी वारंवार उतरतेय? दोष बॅटरीचा नाही, तर ‘मॅग्नेटो कोळशाचा’ असू शकतो! समजून घ्या
  • गाडीचे वजन आणि मायलेज: टाकी काठोकाठ भरल्याने गाडीचे वजन वाढते. वजन जास्त असल्यावर इंजिनवर ताण येतो, ज्यामुळे मायलेज किंचित कमी होऊ शकते.
  • सुरक्षिततेचा धोका: उन्हाळ्यात जास्त तापमान असताना पेट्रोलचे प्रसरण होते आणि वाफ तयार होते. टाकीत अजिबात जागा नसल्यास दबावामुळे गळती होऊन आगीचा धोका निर्माण होऊ शकतो.
थोडक्यात सल्ला

गाडी ची टाकी फुल करणे चुकीचे नाही, पण पेट्रोल पंपावरील नोझल स्वयंचलितपणे कट झाल्यावर वरून अतिरिक्त पेट्रोल भरणे पूर्णपणे टाळावे. सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या ‘ऑटो-कट’ पर्यंतच इंधन भरणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

Web Title: Can we full fuel tank auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • automobile
  • petrol

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.