उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!
उन्हाळ्यात कारच्या सीट्सही कूल ठेवायच्या असतील तर ₹8.20 लाखांपासून कोणत्या कारमध्ये मिळते Ventilated Seats? टाटा एरिसपासून सिट्रोएन बेसाल्ट X पर्यंत या 5 कार्समध्ये मिळणाऱ्या या खास फीचरची माहिती जाणून घ्या
₹8.20 लाखांपासून सुरू होणाऱ्या टाटा एरिसमध्ये Ventilated Front Seats मिळतात, त्यामुळे ती विशेष ठरते.
रेनॉल्ट किगर आणि मारुती बलेनोमध्येही उन्हाळ्यात आराम देणाऱ्या Ventilated Seats मिळतात.
ब्रेझा आणि बेसाल्ट X मध्येही टॉप व्हेरिएंट्ससोबत हे प्रीमियम कम्फर्ट फीचर मिळते.
भारतात उन्हाळ्याचा पारा वाढत असताना कारमधील कम्फर्ट फीचर्सना जास्त महत्त्व मिळत आहे. त्यात Ventilated Seats हे फीचर आता फक्त महागड्या लक्झरी कार्सपुरते मर्यादित राहिलेले नाही. काही तुलनेने स्वस्त कार्समध्येही फ्रंट सीट्ससाठी हे फीचर मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लांब प्रवास करणाऱ्या कस्टमर्ससाठी ही फीचर उपयोगी ठरू शकते.
टाटा एरिस
टाटा मोटर्सची नुकतीच लाँच झालेली एरिस ही Ventilated Front Seats देणाऱ्या सर्वात स्वस्त कार्सपैकी एक आहे. या फीचरची सुरुवात Accomplished व्हेरिएंटपासून होते. Petrol MT ची किंमत ₹8,19,990 असून Petrol AMT ची किंमत ₹8,74,990 आहे. Petrol-CNG MT ची किंमत ₹9,19,990 आणि Petrol-CNG AMT ची किंमत ₹9,74,990 आहे. त्यामुळे CNG ऑप्शनसह हे फीचर मिळणारी कार म्हणूनही एरिस लक्षवेधी ठरते.
रेनॉल्ट किगर ही Ventilated Front Seats मिळणारी भारतातील स्वस्त SUV आहे. हे फीचर फक्त टॉप-स्पेक Emotion ट्रिममध्ये मिळते. Petrol MT व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹8,50,000 आहे. Turbo Petrol MT ची किंमत ₹9,40,000, तर Petrol CVT ची किंमत ₹10,40,000 पासून सुरू होते. Dual-Tone ऑप्शनसहही या व्हेरिएंट्सची निवड करता येते.
मारुती बलेनो
मारुती बलेनोच्या नव्या फेसलिफ्टेड व्हर्जनमध्येही Ventilated Front Seats देण्यात आल्या आहेत. हे फीचर Alpha आणि Alpha (O) ट्रिममध्ये मिळते. याची सुरुवातीची किंमत ₹9,09,900 आहे. Petrol MT सोबत AMT ऑप्शनही मिळतो. तसेच 24.77 km/l पर्यंतची फ्युल इकॉनॉमी ही बलेनोची आणखी एक जमेची बाजू आहे.
मारुती ब्रेझामध्ये Ventilated Front Seats फक्त टॉप-स्पेक ZXi+ ट्रिममध्ये मिळतात. या फीचरसह 1.0L Turbo Petrol MT ची किंमत ₹11,41,500 आहे, तर 1.5L Petrol AT ची किंमत ₹13,70,500 आहे. SUV खरेदी करताना कम्फर्ट फीचर्सना प्राधान्य देणाऱ्यांसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.
सिट्रोएन बेसाल्ट X
सिट्रोएन बेसाल्ट X ही Ventilated Front Seats देणारी स्वस्त मिड-साइज SUV-कूपे आहे. हे फीचर टॉप-स्पेक Max ट्रिममध्ये मिळते. 1.2L Petrol MT ची किंमत ₹11,34,300 असून Turbo Petrol MT आणि AT ची किंमत अनुक्रमे ₹12,62,500 आणि ₹13,89,500 आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील कम्फर्टसोबत SUV-कूपे डिझाइन हवे असणाऱ्यांसाठी हा वेगळा ऑप्शन आहे.
Web Title: Cheapest cars ventilated seats india top five auto news marathi ar