
BMW मोटरराड इंडियाने नवीन BMW R 12 G/S भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. या अॅडव्हेंचर बाइकची एक्स-शोरूम किंमत 25.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाइक CBU म्हणजेच पूर्णपणे तयार स्वरूपात भारतात इम्पोर्ट केली जाणार आहे. कंपनीने केवळ Pro व्हेरिएंट सादर केले असून डिलिव्हरीही तातडीने सुरू होणार आहे.
डिझाइनच्या बाबतीत या बाइकला बीएमडब्ल्यूच्या ऐतिहासिक R 80 G/S मॉडेलपासून प्रेरणा मिळाली आहे. यामध्ये समोर X-आकाराचे लाइट आयकॉन्स आणि LED हेडलॅम्प देण्यात आला आहे. बाइकच्या पुढील भागावर, फ्युल टँकवर आणि मागच्या बाजूला Light White रंगाचा वापर केला आहे. सीटला Light Red रंग देण्यात आला आहे. मागच्या फ्रेमवर 2 स्टील आयलेट्स दिले आहेत, ज्यांचा वापर सामान बांधण्यासाठी करता येतो.
Luxury Electric Car Sales मध्ये 53.1% वाढ! BMW पहिल्या क्रमांकावर, Tesla ची मोठी झेप
बाइकमध्ये 1,170cc एअर/ऑइल-कूल्ड बॉक्सर इंजिन मिळते. हे इंजिन 7,000 rpm वर 107 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 115 Nm टॉर्क निर्माण करते. यामुळे ऑफरोडिंग आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बाइक उपयोगी ठरू शकते. यात 21-इंच फ्रंट आणि 18-इंच रिअर क्रॉस-स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत.
सस्पेन्शनसाठी पुढे 45mm फुली अॅडजस्टेबल USD फोर्क्स असून त्यांचा ट्रॅव्हल 210mm आहे. मागे Paralever स्विंगआर्मसह 200mm ट्रॅव्हल मिळतो. ऑफरोडिंगसाठी Enduro Package हा ऑप्शनही देण्यात आला आहे. यात ऑफरोड टायर्स, Enduro फुटरेस्ट, इंजिन गार्ड आणि हँडलबार रायझर्सचा समावेश आहे.
फीचर्समध्ये BMW Motorrad ABS Pro, Rain, Road, Enduro आणि Enduro Pro असे 4 रायडिंग मोड्स, Dynamic Traction Control, Cruise Control, Heated Grips आणि Shift Assistant Pro मिळतात. याशिवाय Hill Start Control, Headlight Pro आणि Engine Drag Torque Control यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. समोर राउंड इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 12V पॉवर सॉकेटही आहे.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि CEO हरदीप सिंग ब्रार यांच्या मते, नवीन R 12 G/S मध्ये जुन्या R 80 G/S ची ओळख आणि आधुनिक टेक्नोलॉजी यांचा संगम करण्यात आला आहे. 25.40 लाखांच्या किमतीत ही नवीन ADV बाइक अॅडव्हेंचर रायडर्सना किती आकर्षित करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Ans: बीएमडब्ल्यू R 12 G/S ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 25.40 लाख रुपये आहे. कंपनीने ही बाइक केवळ Pro व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे.
Ans: या बाइकला 1,170cc एअर/ऑइल-कूल्ड बॉक्सर इंजिन मिळते. हे इंजिन 107 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते.
Ans: या बाइकमध्ये Rain, Road, Enduro आणि Enduro Pro असे 4 रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. याशिवाय ABS Pro, Dynamic Traction Control आणि Hill Start Control यांसारखी फीचर्सही मिळतात.