फोटो सौजन्य: @odmag (X.com)
भारतीय ऑटो बाजारात वाहनांना असणारी मागणी नेहमीच वाढताना दिसत आहे. याच वाढत्या मागणीमुळे, देशात अनेक विदेशी ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी Citroen. ग्राहक देखील या कंपनीच्या कार्सना चांगली मागणी देत आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये Citroen C3 Sports Edition केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएन हॅचबॅक ते एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार्स विकते. सिट्रोएनने ऑफर केलेले Citroen C3 Sports Edition लाँच झाले आहे. या एडिशनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले आहेत? ते कोणत्या किमतीत लाँच केले आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
सिट्रोएनने भारतीय बाजारात सी३ हॅचबॅक कारची स्पोर्ट्स एडिशन लाँच केले आहे. नवीन एडिशनमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत, परंतु त्याच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
Mahindra XUV 700 चे Facelift व्हर्जनची होतेय टेस्टिंग, ‘हा’ असेल मोठा बदल
Citroen C3 च्या स्पोर्ट्स एडिशनमध्ये स्पोर्टी डेकल्स, अँबियंट लाइट्स आणि स्पोर्टी पेडल्स आहेत. यासोबतच, त्याच्या स्पोर्ट्स एडिशनच्या एक्सटिरिअर आणि इंटिरिअर भागात अनेक खास फीचर्स देखील देण्यात आले आहेत. कारमध्ये स्पोर्टी पेडल किट, कस्टम स्पोर्ट थीम सीट कव्हर, मॅचिंग कार्पेट मॅट, सीट बेल्ट कुशन आहे. या कारमध्ये पर्यायी वायरलेस चार्जर आणि डॅश कॅम देखील बसवता येतील.
माहितीनुसार, स्पोर्ट्स एडिशनमध्ये फक्त कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जात आहे. जे 108.6 बीएचपी पॉवर आणि 205 न्यूटन मीटर टॉर्क देईल. ही कार सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
Citroen C3 Sports Edition मध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे त्याची किंमत थोडी वाढवण्यात आली आहे. नवीन एडिशनमध्ये त्याची सध्याची किंमत सुमारे 21 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. याशिवाय, डॅशकॅम आणि वायरलेस चार्जरसाठी अतिरिक्त 15 हजार रुपये द्यावे लागतील. सध्या, सिट्रोएन सी३ ची एक्स-शोरूम किंमत 6.23 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10.19 लाख रुपये आहे.
सिट्रोएन ही C3 ही हॅचबॅक कार म्हणून देते. ही कार बाजारात Maruti Wagon R, Maruti Swift सारख्या हॅचबॅक कारशी थेट स्पर्धा करते. याशिवाय, ती Tata Punch, Nissan Magnite, Renault Kiger सारख्या एसयूव्हीशी देखील स्पर्धा करते ज्या चार मीटरपेक्षा कमी एसयूव्ही म्हणून दिल्या जातात.