फोटो सौजन्य: iStock
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला एक महिना होत नाही, तेच आता पुन्हा एकदा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटले आहे. हे युद्ध जरी भारताच्या भूमीपासून लांब होत असले तरी याचा फटका भारतीयांच्या खिशावर होण्याची संभावना आहे. यामुळे भारतातील पेट्रो आणि डिझेलच्या किमती वाढण्याची संभावना आहे.
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाच्या एनर्जी मार्केटला हादरवून टाकले आहे आणि त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Middle East मधील अनेक देश हे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे. जेव्हा या प्रदेशात युद्ध किंवा अशांतता असते तेव्हा जगभरातील तेलाचा पुरवठा धोक्यात येतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू लागतात.
ना अंबानी ना अदानी; ‘हा’ अभिनेता ठरला Lamborghini Urus SE खरेदी करणारा पहिला भारतीय, किंमत 5 कोटी !
अलिकडेच ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 6 डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी 78 डॉलर्स प्रति बॅरल ओलांडली आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक किंमत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाल्यावर, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढू लागल्या आहेत.
भारतातील तेलाच्या किमती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. जर ब्रेंट क्रूडच्या किमती अशाच राहिल्या तर तेल मार्केटिंग कंपन्या (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात. सध्या भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल आधीच महाग झाले आहे.
तज्ञांचा असा विश्वास आहे की जर इराण आणि इस्रायलचा संघर्ष मर्यादित राहिला आणि त्याचा तेल पुरवठ्यावर थेट परिणाम झाला नाही, तर त्यामुळे किमतींमध्ये तीव्र आणि लक्षणीय वाढ होणार नाही. परंतु, जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसून येऊ शकतो.
2 लाखाचे डाउन पेमेंट आणि Maruti Suzuki Brezza होईल तुमची, फक्त ‘एवढा’ असेल EMI ?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढल्या तर त्याचा परिणाम केवळ कार किंवा दुचाकी चालकांवरच होणार नाही तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होईल. महागाई वाढेल, वाहनं महाग होईल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती देखील वाढतील.