फोटो सौजन्य: @MahindraXUV700 (X.com)
भारतीय बाजारात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार विकल्या जातात. यातही सर्वस्त जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. ग्राहकांमध्ये असणारी हीच क्रेझ पाहत अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही विभागात दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील दाखल होत आहेत.
हाय परफॉर्मन्स एसयूव्ही म्हंटलं की महिंद्रा कंपनीचे नाव आपसूकच डोळ्यासमोर येते. कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता लवकरच कंपनी XUV 700 चे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे. या एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्राकडून प्रीमियम एसयूव्ही म्हणून ऑफर केलेली महिंद्रा XUV 700 चे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच लाँच केली जाऊ शकते. याबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही अनधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु त्याची टेस्टिंग केली जात आहे.
अहवालांनुसार, या एसयूव्हीच्या फेसलिफ्टची टेस्टिंग केली जात आहे. या टेस्टिंग दरम्यान ही एसयूव्ही पूर्णपणे कव्हर करण्यात आली होती. परंतु त्याच्या हेडलाइट्सबद्दल माहिती समोर आली आहे. महिंद्रा थार रॉक्स प्रमाणे, XUV 700 फेसलिफ्टलाही गोलाकार हेडलाइट्स मिळतील. यासोबतच, त्यात नवीन डिझाइन केलेले ग्रिल देखील दिले जाईल. टेस्टिंग दरम्यान युनिटमध्ये इतर कोणत्याही बदलांची माहिती नाही. परंतु त्यात अनेक नवीन फीचर्स आणि इंटिरिअर दिले जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
या एसयूव्हीच्या टेस्टिंग दरम्यान फारशी माहिती मिळालेली नाही. परंतु त्याच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. सध्याच्या इंजिन ऑप्शन्सप्रमाणे त्यात इंजिन दिले जाईल.
महिंद्रा आता नवीन नावांसह नवीन जनरेशनच्या कार ऑफर करत आहे. महिंद्रा XUV 300 पूर्वी कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून ऑफर केली जात होती, ज्याचे नाव बदलून Mahindra XUV 3XO असे बदलण्यात आले. त्याचप्रमाणे, या सिरीजमध्ये येणाऱ्या महिंद्रा XUV 700 चे नाव देखील महिंद्रा XUV 7X0 असे बदलले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
या एसयूव्हीबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतरच ही कार अनधिकृतपणे सादर केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार सादर केली जाऊ शकते.