
श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू
अभय सप्रे 9 ते 14 नोव्हेंबरदरम्यान मुंबई–पुणे दौऱ्यावर असून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.
भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु
बैठकीत रस्ता अपघात नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्यातील ब्लॅक स्पॉट्स तातडीने दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला जलदगतीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
केंद्र सरकारच्या आयआरएडी पोर्टलचा प्रभावी वापर, आयटीएमएस, एटीएस आणि एडीटीटी प्रकल्पांची जलद अंमलबजावणी तसेच हेल्मेटचा अनिवार्य वापर यावर समितीने विशेष भर दिला. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले.
तसेच जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समित्यांच्या नियमित बैठकांचे आयोजन करून अपघात प्रतिबंधक उपाय सातत्याने राबवावेत, असेही निर्देश देण्यात आले. राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.