फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच तर पूर्वी ज्या कंपन्या इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करीत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki देखील आता लवकरच त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कारप्रेमी या कारच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आता कंपनीने ही कार कधी लाँच होणार याबाबत खुलासा केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
‘हा’ एक स्मार्ट फायनान्स प्लॅन आणि New Hyundai Venue Diesel Variant तुमची झालीच म्हणून समजा!
मारुती ई विटारा ही मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार म्हणून लाँच केली जाणार आहे. कंपनी ही एसयूव्ही मिड साईझ इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक नवीन फीचर्ससह लाँच करेल.
अहवालांनुसार, कंपनी ही एसयूव्ही 2 डिसेंबर 2025 रोजी भारतात अधिकृतपणे लाँच करण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, मारुती सुझुकीच्या एमडी आणि सीईओ यांनी ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की ही एसयूव्ही लवकरच लाँच केली जाईल, परंतु महिना निश्चित करण्यात आला नव्हता.
कंपनी ही एसयूव्ही भारतात लाँच करण्यापूर्वीच ती आधीच अनेक देशांमध्ये निर्यात करत आहे. आतापर्यंत 7000 हून अधिक युनिट्स इतर देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, ज्यात यूकेचा समावेश आहे.
October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल
मारुती 49 किलोवॅट प्रति तास आणि 61 किलोवॅट प्रति तास पर्यायांसह दोन बॅटरी पॅकसह ई-विटारा लाँच करण्याची अपेक्षा आहे. ही कार एका चार्जवर 500 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. ही मोटर 184 हॉर्सपॉवर निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.
कंपनीकडून या मॉडेलमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात येणार आहेत. यात पॅनोरमिक सनरूफ, LED लाइट्स, LED DRL, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सात एअरबॅग, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, लेव्हल-2 ADAS, ड्युअल-टोन इंटीरियर असे आकर्षक फीचर्स उपलब्ध असतील.
कंपनीकडून लाँचच्या वेळी या कारची अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. मात्र, अंदाजानुसार याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 17 ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.






