फोटो सौजन्य: iStock
अनेक वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या कार भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये विकत असतात. या कारच्या विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांकडून अनेक ऑफर्स दिल्या जातात. जर तुम्हीही या महिन्यात टाटा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीकडून या महिन्यात कोणत्या कारवर किती डिस्काउंट ऑफर दिली जात आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
टाटाकडून प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये टाटा अल्ट्रोझ ही जबरदस्त कार विकली जाते. या महिन्यात या कारच्या 2024 मधील युनिट्सची खरेदी केल्यास ग्राहकांची जास्तीत जास्त बचत होऊ शकते. कंपनी या कारवर 1.35 लाख रुपयांच्या ऑफर्स देत आहे. ही ऑफर त्याच्या पेट्रोल रेसर व्हेरियंटवर उपलब्ध आहे. याशिवाय, या कारच्या सर्व व्हेरियंटवर 1 लाख रुपयांपर्यंत बचत करता येते. तसेच 2025 चे युनिट खरेदी केल्याने तुमचे 45 हजार रुपये वाचू शकतात.
New Nissan Magnite चा ग्लोबल मार्केटमध्ये जलवा, 50000 युनिट्सची निर्यात पूर्ण
टाटा सफारी ही कंपनी प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. जर ही कार या महिन्यात खरेदी केली तर तुम्हाला 75 हजार रुपयांच्या ऑफरमध्ये मिळू शकते. ही ऑफर कारच्या 2024 युनिट्सवर दिली जात आहे. 2025 चा युनिट खरेदी करून, या महिन्यात तुम्ही 50 हजार रुपये वाचवता येतील.
टाटा हॅरियर ही मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून टाटाकडून विकली जाते. जर तुम्हाला या कारचे 2024 युनिट्स खरेदी करायचे असतील तर हीच संधी आहे. कारण या कारवर 75 हजार रुपयांच्या ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. ही ऑफर कारच्या 2024 युनिट्सवर दिली जात आहे. 2025 चा युनिट खरेदी करून, या महिन्यात तुम्ही या कारच्या खरेदीवर 50 हजार रुपयांची बचत करू शकता.
February 2025 मध्ये ग्राहकांना भुरळ याच ‘कार्स’ची, ‘ही’ कार ठरली ग्राहकांची पहिली पसंत
टाटाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉन देखील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जर तुम्ही मार्चमध्ये ही एसयूव्ही खरेदी केली तर तुमचे 45 हजार रुपये वाचतील. ही ऑफर या कारच्या 2024 युनिट्सवर उपलब्ध असेल. त्याच वेळी, 2025 युनिट्सवर ग्राहक 15 हजार रुपये वाचवू शकतात.
टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Tata Punch खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच महिन्यात ही कार बुक करून टाका. कारण या महिन्यात या कारवर तुम्ही 25 हजार रुपये वाचवू शकता. ही बचत कारच्या 2024 युनिट्सवर असेल. जर तुम्हाला या कारचे 2025 चे युनिट खरेदी करायचे असेल, मार्चमध्ये फक्त 25000 रुपयांच्या ऑफर्स मिळतील.