फोटो सौजन्य: iStock
निस्सान मॅग्नाइटने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, कारण आता ती पूर्णपणे ई२० सुसंगत झाली आहे. **न्यू निस्सान मॅग्नाइट बीआर१० (नॅचरली एस्पिरेटेड इंजिन) आता ई२० सुसंगत असून तिने ब्रँडच्या शाश्वत मोबिलिटीच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे. या अपडेटमुळे मॅग्नाइटचे दोन्ही पॉवरट्रेन पर्याय, नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज इंजिन, आता पूर्णपणे ई२० सुसंगत आहेत. यामुळे निस्सानने पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक मोठा पाऊल उचलला आहे आणि भारत सरकारच्या वाढत्या इंधन प्रमाणांच्या दिशेने आवश्यक असलेल्या बदलांची तयारी दर्शविली आहे.
निस्सान मॅग्नाइटच्या यशस्वी वाटचालीत एक मोठा मीलाचा दगड म्हणजे ५०,००० गाड्यांची निर्यात स्थापनेसाठी सुरूवात केली तेव्हा निस्सानने भारताला एक महत्त्वाचे निर्यात केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते यशस्वीरित्या साधले. यामध्ये लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) आणि राइट हँड ड्राइव्ह अशा दोन्ही प्रकारच्या बाजारपेठांचा समावेश आहे. २०२५ च्या फेब्रुवारीत, निस्सानने ८५६७ गाड्यांची एकत्रित विक्री केली, ज्यामध्ये ६२३९ गाड्यांची निर्यात आणि २३२८ गाड्यांची देशांतर्गत विक्री समाविष्ट आहे. या निर्यातीत फेब्रुवारी २०२४ च्या तुलनेत ९७ टक्क्यांची वाढ झाली आहे, ज्यामुळे मॅग्नाइटच्या जागतिक मागणीला स्पष्ट संकेत मिळतो.
Toyota Fortuner झाली अजूनच दिमाखदार, मिळाली ‘ही’ खास गोष्ट
निस्सान मॅग्नाइटच्या निर्यातीत यश मिळाल्यामुळे, भारताचे महत्त्वाचे निर्यात केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. २०२५ मध्ये निस्सानने मॅग्नाइटच्या एलएचडी आवृत्तीची निर्यात सुरू केली आणि चेन्नईतील कामराजर पोर्ट मधून सुमारे २९०० गाड्या लॅटिन अमेरिकन (LATAM) बाजारपेठेत पाठवली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सुमारे २००० गाड्या मध्यपूर्व, उत्तर अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशांमध्ये पाठवली गेली. ५१०० गाड्या निवडक लॅटिन अमेरिकन बाजारपेठेत पाठवून, निस्सानच्या वन कार वन वर्ल्ड धोरणाचा अंमलबजावणी केली आहे. यामुळे भारताच्या निर्यात क्षमतेला आणि जागतिक विस्तारास महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “न्यू निस्सान मॅग्नाइट जागतिक बाजारपेठांमध्ये अत्यंत लोकप्रिय होऊ लागली आहे. या गाडीने ५०,००० निर्यात विक्रीचा एक मोठा टप्पा पार केला. हे कामगिरी निस्सानच्या गुणवत्ता, नाविन्य आणि कामगिरीच्या क्षमता वाढवण्याचा आदर्श दर्शवते. मॅग्नाइटच्या पूर्ण ई२० सुसंगततेने आमच्या शाश्वत मोबिलिटीच्या वचनबद्धतेला आणखी बळ दिले आहे. आमचा भारतातील धोरण निश्चितपणे यशस्वी आहे, आणि न्यू निस्सान मॅग्नाइटमध्ये सातत्याने बदल आणि नवकल्पनांचा समावेश आमच्या या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.”
टाटा मोटर्सचे ट्रक आता हायड्रोजनवर धावणार, काय आहेत हायड्रोजन फ्यूएलचे फायदे तोटे?
नवीन निस्सान मॅग्नाइट आता ६५ देशांमध्ये उपलब्ध आहे, आणि ती राइट हँड ड्राइव्ह आणि लेफ्ट हँड ड्राइव्ह अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीचे बोल्ड आणि स्टायलिश डिझाइन, २०+ प्रथम फीचर्स, श्रेणीतील सर्वोत्तम फीचर्स आणि ५५+ सेफ्टी फीचर्स यामुळे ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्रातील एक आकर्षक आणि विश्वासार्ह गाडी बनली आहे.
निस्सान मॅग्नाइटचे यश निस्सानच्या वैश्विक धोरणाचा आणि भारतातील कार्यान्वयनाचा एक उत्तम परिणाम आहे. यामुळे निस्सानच्या निर्यात धोरणाला पंख मिळाले आहेत आणि भारतामध्ये आपल्या उत्पादनांची जागतिक मागणी आणखी वाढवली आहे.