फोटो सौजन्य - Social Media
देशात दरवर्षी रस्त्यावरील अनेक दुर्घटना समोर येत असतात. अनेक लोकांना रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये जास्तकरून त्या लोकांचा समावेश असतो, जे स्वतः हेल्मेट घालणे टाळतात आणि रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करतात. अशा मध्ये पुण्यात महत्वाचा निर्णय लागू करण्यात आला आहे. हा निर्णय फार महत्वाचा ठरणार आहे. कारण जर एका दुचाकीवर दोन जण स्वार असतात. त्यावेळी फक्त चालकालाच नव्हे तर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटची तितकीच गरज असते. अशा वेळी दोन्ही जणांनी हेल्मेट घातले की दुर्घटनेत होणाऱ्या जीवित हानीला रोखता येऊ शकते. जर दोन्ही प्रवाशांकडे हेल्मेट असेल तर कदाचित दुर्घटनेत होणाऱ्या जीवित हानीच्या संख्येत कमतरता येईल.
मुळात, पुण्यात या मुद्द्याला RTO ने धरून ठेवले होते. अखेर या नियमाला मान्यता मिळाली आहे. आता, ग्राहकांना दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट घेणे सक्तीचे असणार आहे. RTO चे असे म्हणणे आहे कि जर बाईकवर स्वार असणाऱ्या दोघांनी प्रवासादरम्यान हेल्मेट परिधान केले तर दुर्घटनेचे प्रमाण कमी करता येईल तसेच लोकांचा जीव वाचवता येईल. त्यामुळे मोटार वाहन अधिनियममधील नियम क्रमांक १३८ नुसार या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
टू-व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष आणि स्टीलबर्ड हेल्मेटचे एमडी राजीव कपूर यांनी पुणे आरटीओच्या निर्णयाचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. त्यांचे असे म्हणणे आहे की, “आरटीओचा निर्देश हा प्रत्येक दुचाकी वाहन खरेदीदाराला दोन हेल्मेट मिळावेत याची खात्री करण्यासाठी आहे – एक चालकासाठी आणि एक मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी. हा एक प्रगतिशील आणि अत्यावश्यक मुद्दा आहे. हा मुद्दा केवळ हेल्मेट परिधान करण्याच्या महत्त्वावर जोर देत नाही तर रस्ता सुरक्षिततेचीही खात्री करतो. आम्ही या आदेशाला मनापासून पाठिंबा देतो आणि हेल्मेटच्या जीवनरक्षक फायद्यांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी वचनबद्ध आहोत. ”
तसेच राजीव कपूर यांनी ग्राहकांना बोगस हेल्मेट खरेदी करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की असे काही हेल्मेट आहेत ज्यांची किंमत १३० रुपयांहून कमी असते. या हेल्मेटवर १००० रुपये अशी किंमत आणि ISI मार्क जरी नमूद असला तरी तो हेल्मेट बोगस असतो. असे हेल्मेट दुर्घटनेवेळी जीव वाचवणारे नव्हे तर जीव घेणे ठरतात. त्यामुळे हेल्मेट घेताना तपासून घ्यावे.