फोटो सौजन्य: iStock
जेव्हा एखादया घरात त्यांची स्वतःची कार येते, तेव्हा तो क्षण आणि त्यामागचा आनंद हा काही औरच असतो. खरंतर स्वतःची कार विकत घेणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण कार खरेदी करताना आपले बजेट आखत असतात. तसेच काही जण कार खरेदी करताना डिस्कॉउंट्सवर सुद्धा विशेष लक्ष देताना दिसतात. जर तुम्ही सुद्धा या नवीन वर्षात कार खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
SUV उत्पादक कंपनी Jeep जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या SUV वर लाखो रुपयांच्या डिस्कॉउंट्स ऑफर करत आहे. या महिन्यात कंपनी कोणत्या SUV वर किती सूट देत आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
जीपने भारतीय बाजारपेठेत जीप ग्रँड चेरोकी ऑफर दिली आहे ज्यामध्ये अतिशय शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स दिले आहेत. जानेवारी 2025 मध्ये कंपनीकडून या कारवर एक उत्कृष्ट डिस्काउंट ऑफर करत आहे. जीपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी केली तर तीन लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. यासह, तुम्हाला Jeep Wave Exclusive Ownership Programme मध्ये प्रवेश देखील मिळेल.
या महिन्यात जीपची सात सीट्स असणारी एसयूव्ही जीप मेरिडियन खरेदी करणे देखील फायदेशीर ठरू शकते. कंपनी या महिन्यात ही SUV खरेदी करण्यासाठी 2.60 लाख रुपयांची ऑफर देत आहे.
मार्केटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या MG Windsor EV Exclusive Variant ला फक्त 3 लाखात आणा घरी
जीप कंपास भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त एसयूव्ही म्हणून जीपने ऑफर केली आहे. तुम्ही या महिन्यात जीपची ही स्वस्त एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारवर 3.20 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.
या महिन्यात, जीप आपल्या SUV वर कॉर्पोरेट ऑफर देत आहे. या अंतर्गत काही निवडक कॉर्पोरेट्सना जीप कंपास आणि जीप मेरिडियनवर 1.4 आणि 1.85 लाख रुपयांपर्यंतचे विशेष फायदे दिले जात आहेत. या ऑफर 2024 मध्ये उत्पादित केलेल्या उर्वरित युनिट्सवर दिल्या जात आहेत.
कंपनीने आपल्या वेबसाइटवर या डिस्काउंट ऑफर्सची माहिती दिली आहे. परंतु शहर आणि शोरूमनुसार ही ऑफर बदलू शकतात. म्हणून, सवलतीच्या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी तुमच्या जवळच्या शोरूमला भेट देण्याचा प्रयत्न करा आणि नंतर कार बुक करा.