
सीयूईटी यूजीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
परीक्षा ११ मे ते ३१ मे दरम्यान होणार
30 जानेवारीपर्यंत भरता येणार अर्ज
पुणे: देशातील केंद्रीय, राज्य, खासगी तसेच अभिमत विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (Career News) प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट – यूजी (सीयुईटी – युजी) परीक्षेसाठी (Exam) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या प्रवेश परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, दि. ३ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना दि.३० जानेवारी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
यंदा सीयूईटी-यूजी परीक्षा ११ मे ते ३१ मे या कालावधीत घेण्यात येण्याची शक्यता आहे. ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी मोड) होणार असून, भारतातील विविध परीक्षा केंद्रांसह काही परदेशातील केंद्रांवरही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच उमेदवारांना अर्ज करावा लागणार असून, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. प्रत्येक उमेदवाराला फक्त एकच अर्ज भरण्याची परवानगी असेल.
वेळापत्रक
अर्ज भरण्याची अंतिम दि. ३० जानेवारी
शुल्क भरण्याची अंतिम दि. ३१ जानेवारी
अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दि. २ ते ४ फेब्रुवारी
परीक्षेचा अपेक्षित कालावधी दि. ११ ते ३१ मे
शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण
शासनाच्या विविध भरती प्रक्रियांमध्ये कॉमर्स (बी.कॉम) पदवीधरांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आता विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे. यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्री, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयीन स्तरावर निवेदने परत करूनही कोणतीही ठोस दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनी थेट आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देत कॉमर्स पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करून प्रतीकात्मक निषेध नोंदवला आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी अत्यंत ठाम शब्दांत सवाल उपस्थित केला की, “यूजीसी मान्य आणि विद्यापीठाने प्रदान केलेली कॉमर्स पदवी जर शासकीय नोकरीसाठी उपयुक्त नसेल, तर अशा शिक्षणाचा उपयोग काय?”
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये कॉमर्स शाखेला तांत्रिक दर्जा देण्यात यावा,लेखा, लेखापरीक्षण व वित्तीय स्वरूपाच्या पदांसाठी कॉमर्स पदवी अनिवार्य करण्यात यावी. नव्या पदवीधरांना संधी मिळावी यासाठी अनुभवाची अट रद्द करण्यात यावी, या आहेत. जर यापुढेही शासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, तर ही लढाई केवळ विद्यापीठ स्तरावर मर्यादित राज्यव्यापी आंदोलनाच्या दिशेने नेण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.