
या मोटरसायकलमध्ये 1,103cc क्षमतेचे Desmosedici Stradale 90-डिग्री V4 इंजिन आहे. हे इंजिन 205 hp पॉवर आणि 88.3 lb-ft टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत Ducati Quick Shift 2.0 मिळत असल्याने क्लच न वापरता गिअर अपशिफ्ट आणि डाउनशिफ्ट करता येतात. इंजिनमध्ये काउंटर-रोटेटिंग क्रँकशाफ्ट, डेस्मोड्रोमिक व्हॉल्व्ह अॅक्च्युएशन आणि लिक्विड कूलिंगसारख्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
क्रूझ कंट्रोलसह BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
चेसिस आणि सस्पेन्शनमध्येही डुकाटीने तडजोड केलेली नाही. स्टँडर्ड V4मध्ये पूर्णपणे अॅडजस्टेबल 43mm शोवा BPF फोर्क आणि सॅक्स रिअर शॉक मिळतो. V4 Sमध्ये Öhlins NIX30 फोर्क, TTX36 रिअर शॉक आणि सेमी-अॅक्टिव्ह Smart EC 3.0 इलेक्ट्रॉनिक्स दिले आहेत. V4 Sचे वजन 417 पाउंड असून स्टँडर्ड मॉडेलचे वजन 421 पाउंड आहे.
ब्रेकिंगसाठी पुढे 330mm सेमी-फ्लोटिंग डिस्क आणि Brembo Hypure 4-पिस्टन मोनोब्लॉक कॅलिपर्स आहेत. मागे 245mm डिस्क मिळते. Race eCBS, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्लाइड कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोलसारखी इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणाली 205 hpच्या पावरला कंट्रोल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 6.9-इंच TFT डिस्प्ले आणि एरोडायनॅमिक विंगलेट्सही मिळतात.
कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
मात्र ही बाइक केवळ आरामासाठी बनवलेली नाही. 33.3-इंच सीट, कमी विंड प्रोटेक्शन, इंजिनमधून निर्माण होणारी उष्णता आणि अग्रेसिव टायर्स यामुळे ती अजूनही सिरीयस परफॉर्मन्स मशीन आहे. त्यामुळे डुकाटी स्ट्रीटफायटर V4 ही कम्यूटरपेक्षा अशा रायडर्ससाठी आहे, ज्यांना सुपरबाइकसारखी वर्किंग हवी आहे; पण ट्रेडीशनल सुपरबाइकसारखी जास्त पुढे झुकलेली रायडिंग पोझिशन नको आहे.