(फोटो सौजन्य-AI एआय)
बीगॉस सी12 मॅक्सरमध्ये 3.8 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरची मोटर 4.2 kW पर्यंत पीक पॉवर निर्माण करते आणि तिचा टॉप स्पीड 75 किमी/ता पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. रायडरला परिस्थितीनुसार Eco, Ride आणि Sport असे 3 राइडिंग मोड निवडता येतात. पार्किंग किंवा अरुंद जागेत स्कूटर हाताळणे सोपे व्हावे यासाठी रिव्हर्स मोडही उपलब्ध आहे.
या स्कूटरचे खास आकर्षण म्हणजे कंपनीची HyperZen इन-व्हील मोटर टेक्नॉलॉजी. मोटर, गिअर, ब्रेक आणि मोटर कंट्रोल युनिटची रचना चाकाच्या हबमध्ये करण्यात आल्याने बाहेरील बेल्ट किंवा चेनची गरज कमी होते. त्यामुळे देखभालीच्या दृष्टीनेही हे स्ट्रक्चर फायदेशीर ठरू शकते.
फीचर्सच्या बाबतीतही बीगॉसने कुटुंबाच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत. सीटखाली 2 हेल्मेट ठेवता येईल इतकी स्टोरेज स्पेस, छत्रीसाठी पॉप-आउट होल्डर, फोन आणि बाटलीसाठी जागा तसेच वायरलेस स्मार्टफोन चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. सर्व आवश्यक माहिती दाखवण्यासाठी 5-इंच TFT डिस्प्ले मिळतो.
राइड क्वालिटीसाठी 12-इंच अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, पुढील बाजूस हायड्रॉलिक टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे 5-स्टेप अॅडजस्टेबल नायट्रॉक्स गॅस-चार्ज्ड सस्पेन्शन दिले आहे. सुरक्षिततेसाठी 220 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे. 160 mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 150 किलो पर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ही स्कूटर स्पार्कलिंग वाइन विथ शॅम्पेन गोल्ड, टेरा ग्रीन विथ शॅम्पेन गोल्ड, पर्ल व्हाइट आणि सॅटिन ब्लॅक अशा 4 प्रीमियम रंगांमध्ये अवेलेबल आहे.






